ETV Bharat / state

पिस्तूल विकणाऱ्या दोघांना पोलिसांनी केली अटक; पाच जिवंत काडतूसही जप्त

author img

By

Published : Mar 19, 2020, 3:18 PM IST

Police arrest two suspects Who sells pistols in Amravati
पिस्टल विकणाऱ्या दोघांना पोलिसांनी केली अटक; पाच जिवंत काडतुसही जप्त

शहरात शोभागरप परिसरात देशी बनवटीची पिस्तूल विक्रीच्या तयारीत असणाऱ्या दोघाना पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे पिस्तूलसह दोन जिवंत काडतूसही आढळून आली आहेत.

अमरावती - शहरात शोभानगर परिसरात देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीच्या तयारीत असणाऱ्या दोघांना गाडगेनगर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याजवळून दोन जिवंत काडतूसही जप्त करण्यात आल्याली आहेत. धम्मप्रकाश अजाबराव मोहोड (वय 29 ) आणि श्रीकांत भीमराव कांबळे (वय 29 ) असे पोलिसांनी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. हे दोघेही अमरावतीच्या जय सियारामनगर येथील रहिवासी आहेत.

पिस्टल विकणाऱ्या दोघांना पोलिसांनी केली अटक; पाच जिवंत काडतुसही जप्त

सकाळी गाडगेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे हे सहायक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे, महेश इंगोले, पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल तायवाडे शेखर गेडाम, सतीश देशमुख, सुभाष पाटील, विषाल वाकपांजर, रोशन वऱ्हाडे हे एका शोध मोहिमेवर होते. त्यांना गुप्त बातमीदाराकडून डॉ निकम हे त्यांची दुचाकी घेऊन शोभानगर परिसरातील मणिपूरची वाडी येथील निर्मनुष्य जागेवर देशी कट्ट्याच्या विक्रीसाठी येणार आहेत, अशी माहिती मिळाली. ही माहिती मिळताच पोलिसांचे पथक सदर ठिकाणी रवाना झाले. दोन संशयित तरुण दुचाकीने शोभानगर मार्गावरील निर्जनस्थळी उभे असलेले दिसून आले. पोलिसांनी त्यांना घेरले. यावेळी त्यांच्याजवळच्या दुचाकीची झडती घेतली असता गाडीच्या डिकीतून एक काळ्या रंगाची पिस्तूल सापडली. या मुद्देमालाची किंमत पन्नास हजार रुपये असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सांगितले. यावेळी एकूण 97 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपींनी ही पिस्तूल नेमकी कोठून आणली याचा तपास पोलीस करत आहेत.

तडीपार व्याक्तीला अटक -

गाडगेनगर पोलिसांनी आज सकाळी दिनेश मानसिंग जाधव (वय 26) या तडीपार तरुणास शोभानगर येथून अटक केली. त्याच्याजवळ धारदार शस्त्र आढळून आले पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.