ETV Bharat / state

शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याचा पवारांनी मुख्यमंत्र्यांना सल्ला द्यावा- डॉ अनिल बोंडे

author img

By

Published : Oct 18, 2020, 9:52 PM IST

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी केंद्र सरकारने मदत करावी, अशी मागणी पवार यांनी केली.

Kisan Morcha President Dr. Anil Bonde
किसान मोर्चाचे अध्यक्ष डॉ अनिल बोंडें

अमरावती - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी केंद्र सरकारने मदत करावी, अशी मागणी पवार यांनी केली. या पार्श्वभूमीवर, आता पंचनामे करण्यात वेळ घालवण्यापेक्षा राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत कशी मिळेल. यासाठी शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सल्ला द्यावा, असे मत किसान मोर्चाचे अध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी व्यक्त केले.

किसान मोर्चाचे अध्यक्ष डॉ अनिल बोंडे
शरद पवार यांच्या दौऱ्याविषयी डॉ. अनिल बोंडे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. २५ हजार रुपये प्रति हेक्टर कोरडवाहू आणि ५० हजार रुपये प्रति हेक्टर ओलीत शेतीला तसेच एक लाख रुपये फळबागांना मदत करू, अशी घोषणा त्यांनी केली होती, ती आधी पूर्ण करावी. शेतकऱ्यांच्या झालेल्या या नुकसानाची केंद्र सरकारने व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतलीच आहे. परंतु ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी एसडीआरएफच्या माध्यमातून प्रत्येक वेळेला मदत केली आणि त्यानंतर केंद्र सरकारकडे मागणी केली. त्याचप्रमाणे यावेळी सुद्धा राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे असल्याचे बोंडे म्हणाले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.