ETV Bharat / state

Nana Patole Criticizes BJP : भाजपने निराधांना मिळणारा आधारही केला प्रायव्हेट लिमिटेड, नाना पटोले यांचा भाजपवर हल्लाबोल

author img

By

Published : Jan 12, 2023, 8:10 PM IST

राज्यातील भाजप सरकारने संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरिबांना मिळणारा आधार एका खासगी कंपनीमार्फत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार श्रीकांत भारतीय यांनी तर्फण नावाच्या संस्थेला हे कंत्राट दिले आहे.

Nana Patole
नाना पटोले

नाना पटोले यांचा भाजपवर हल्लाबोल

अमरावती - भारतातली लोकशाही संपुष्टात आणण्याचे काम भाजप सातत्याने करते आहे. संजय गांधी निराधार योजनेतून राज्यातील निराधारांना मिळणारा आधार आता एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून देण्याचा दुर्दैवी निर्णय राज्यातील भाजप सरकारने घेतला आहे. अमरावती जिल्ह्याचेच प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार श्रीकांत भारतीय यांच्या तर्फण या संस्थेला हा कंत्राट देण्यात आले आहे.

मिळनारा आधारच बवनणार निराधार - आता ही संस्था राज्यभरातील निराधारांना पैशाचे वितरण करणार आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असून हा प्रकार ऑफिस ऑफ प्रॉफिट या नियमाला डावलून सरकारने हा निर्णय घेतला आहे. या सरकारची अशी अनेक धोरणं ही लोकशाहीसाठी घातक ठरणारी असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी आयोजित जाहीर सभेत केला.

धीरज लिंगाडेना उमेदवारी - अमरावती विभाग पदवीधर मतदार संघात काँग्रेसच्या वतीने बुलढाण्याचे धीरज लिंगाळे यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. आज महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वऱ्हाडे मंगल कार्यालय येथे आयोजित जाहीर सभेत पटोले यांनी ही उमेदवारी जाहीर केली. यावेळी काँग्रेसचे माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते, माजी खासदार अनंत गुढे दर्यापूरचे काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे बाळापूरचे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख, नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार अभिजीत वंजारी, आमदार वजाहत मिर्झा यांच्यासह काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समृद्धी महामार्ग सर्वसामान्यांसाठी नाही - समृद्धी महामार्ग तयार केल्याचा गौगवा देवेंद्र फडणवीस सातत्याने करीत आहेत. या महामार्गावरून सर्वसामान्य व्यक्तीची कार धावू शकत नाही. या महामार्गाचे उद्घाटन झाले त्यानंतर या महामार्गावर अनेक अपघात झाले असून, सर्वसामान्यांना जीव गमवावा लागला आहे. समृद्धी महामार्ग हा केवळ उद्योजकांच्या सुविधेसाठी निर्माण करण्यात आला असल्याचे नाना पटोले म्हणाले. समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपमधील अनेक नेत्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून येत्या काही दिवसात हा संपूर्ण घोटाळा जनतेसमोर आणण्यात येईल असे, देखील नाना पटोले म्हणाले.

भाजपकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान - भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला जातो आहे. ज्या महाराजांचे नाव आम्ही मोठ्या आदराने, स्वाभिमानाने घेतो त्यांचे नाव भाजपचे नेते एकेरी शब्दात घेतात. राज्याचे राज्यपाल महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या बाबत अपशब्द काढतात. भाजपला महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत असा आरोप देखील नाना पटोले यांनी केला.


राणा , सोमय्या, कंबोज यांच्यावर टीका - आज महाराष्ट्रात गैर-मराठी असणाऱ्या आमदार रवी राणा किरीट सोमय्या, मोहित कंबोज सारख्या लोकांची सरकारमध्ये चर्चा सुरू आहे. अशा लोकांच्या तक्रारीवरून मराठी नेत्यांची ईडीकडून चौकशी करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप देखील नाना पटोले यांनी केला



सर्वांच्या प्रयत्नातून होईल भाजपचा पराभव - भाजपने जे काही घाणेरडे राजकारण केले आहे, त्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीत भाजपचा पराभव केला. यापुढे होणाऱ्या अनेक निवडणुकीत आपल्या विजयाचा मार्ग शुकर होईल असे देखील नाना पटोले यावेळी म्हणाले.

हेही वाचा - Graduate Constituency Election : भाजप जोमात काँग्रेस विचारात बच्चू कडू रवी राणांना हवी फक्त चर्चा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.