ETV Bharat / state

आमदारासह खासदारांचा एकाच दुचाकीवरुन प्रवास, व्हिडिओ व्हायरल

author img

By

Published : May 29, 2019, 8:25 AM IST

Updated : May 29, 2019, 9:47 AM IST

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा सातूर्णा चौक येथून दुचाकीवर जात असताना एका कार्यकर्त्याने मोबाईल कॅमेऱ्यात व्हिडिओ तयार केला. तो व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

राणा दाम्पत्य

अमरावती - खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे दोघेही एकाच दुचाकीवर स्वार होऊन सुसाट वेगाने जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यापूर्वीही हे दाम्पत्य अनेकदा दुचाकीवर शहरात फेरफटका मारताना दिसले होते. मात्र, आता जिल्ह्याच्या खासदार आणि बडनेराचे आमदार यांची दुचाकीवारी चांगलीच चर्चेत आली आहे.

राणा दाम्पत्य

अमरावती लोकसभा मतदार संघाचे चित्र २३ मे रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास स्पष्ट झाले. त्यानंतर अमरावती बडनेरा मार्गावरील नेमाणी गोडाऊन या मतमोजणी केंद्रावर विजयाचे प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी हे दाम्पत्य दुचाकीवर स्वार होऊन त्यांच्या शंकर नगर येथील निवास्थानावरुन निघाले. यावेळी त्यांच्यासोबत कार्यकर्तेही दुचाकी घेऊन होते.

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा सातूर्णा चौक येथून दुचाकीवर जात असताना एका कार्यकर्त्याने मोबाईल कॅमेऱ्यात व्हिडिओ तयार केला. आता या व्हिडिओसोबत गाणे जोडून हा व्हिडिओ व्हायरल केला जात आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओची धूम सुरू असताना आमदार दुचाकीवर आपल्या नवनियुक्त खासदार पत्नीला घेऊन निघाले असताना घाईत हेल्मेट घालायचे विसरले की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Intro:( व्हिडिओ मेलवर पाठवला)
अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे दोघेही एकाच दुचाकीवस्वार होऊन सुसाट वेगाने जात असल्याचा व्हिडिओ सद्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरतो आहे. यापूर्वी राणा दाम्पत्य अनेकदा दुचाकीवरस्वार होऊन शहरात फेरफटका मारताना अनेकदा दिसले असले तरी आता जिल्ह्याच्या खासदार आणि बडनेराचे आमदार यांची दुचाकीवारी चांगलीच चर्चेत आली आहे.


Body:23 मे रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास अमरावती लोकसभा मतदार संघाचे चित्र स्पष्ट झाल्यावर अमरावती बडनेरा मार्गावरील नेमाणी गोडाऊन या मतमोणी केंद्रावर विजयाचे प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी राणा दाम्पत्य एकाच दुचाकीवर स्वार होऊन त्यांच्या शंकर नगर येथील निवस्थानावरून निघाले. यावेळी त्यांचतासोबत कार्यकर्तेही दुचाकी घेऊन सोबत होते. सातूर्णा चौक परिसरातुन असमदार राणा यांच्या दुचाकीस्वार कार्यकर्त्याने आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा एकाच दुचाकीवर सुसाट वेगाने निघाले असल्याचे मोबाईल कॅमेऱ्यात विडिओ काढला.आता या विडिओ सोबत गाणे जोडून हा व्हिडिओ वायरल केला आहे. सोशल मीडियावर या विडिओची धूम सुरू असताना आमदार दुचाकीवर आपल्या नवनियुक्त खासदार पत्नीला निघाले असताना घाईत हेल्मेट घालायचे विसरले की काय असा प्रश्नही उपस्थित केला जातो आहे.


Conclusion:
Last Updated : May 29, 2019, 9:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.