ETV Bharat / state

Bacchu Kadu : अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बच्चू कडूंचा विजय; काँग्रेसला मोठा धक्का

author img

By

Published : Jul 24, 2023, 4:27 PM IST

Updated : Jul 24, 2023, 4:40 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत अचलपूरचे आमदार बच्चू कडू हे विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वीरेंद्र जगताप यांचा एक मताने पराभव केला आहे.

विजयानंतर प्रतिक्रिया देताना आमदार बच्चू कडू

अमरावती - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर गट पंधरा वर्षांपासून काँग्रेसची सत्ता होती. या निवडणुकीत आज 21 संचालकांनी मतदान केले. 21 पैकी अकरा मते ही आमदार बच्चू कडू यांना पडली, तर वीरेंद्र जगताप यांना दहा मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आमदार बच्चू कडू यांना मतमोजणीनंतर अध्यक्ष म्हणून जाहीर केले, तर उपाध्यक्ष म्हणून बच्चू कडू यांच्या गटातील अभिजीत ढेपे विजयी झाले आहेत.

आपल्या लोकांना सोबत घेऊन चालणे त्यांना जमले नाही. याचाच परिणाम म्हणजे आज त्यांचा पराभव झाला - बच्चू कडू, आमदार

हुकूमशाही चालत नाही - या निवडणूक निकालाद्वारे हुकूमशाही चालत नाही हे स्पष्ट झाले आहे. आपल्या विरोधात आपले संचालक उपोषण करतात ही बाब शोभणारी नाही. आपल्या लोकांना सोबत घेऊन चालणे त्यांना जमले नाही. याचाच परिणाम म्हणजे आज त्यांचा पराभव झाला अशी, प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी निवडणूक निकालानंतर पत्रकारांशी बोलताना दिली. येणाऱ्या काळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्यावर आपला भर राहील, असे देखील आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

बच्चू कडू यांनी बाजी मारली - अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेवर काँग्रेसने अनेकवर्षापासून सत्ता टिकून ठेवली होती. पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये प्रत्येकाला एक वर्ष अशा पद्धतीने काँग्रेसचा फॉर्म्युला ठरला होता. यावर बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने पहिल्यांदाच ही निवडणूक लढवत आपले उमेदवार निवडून आणले होते. बँकेचे यापूर्वीचे अध्यक्ष सुधाकर भारसाकळे यांनी एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून राजीनामा दिला होता. आज झालेला जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चांदुर रेल्वे मतदार संघाचे माजी आमदार वीरेंद्र जगताप विरुद्ध आमदार बच्चू कडू अशी निवडणूक रंगली होती. यामध्ये बच्चू कडू यांनी बाजी मारली.

हेही वाचा -

  1. Bachchu Kadu On Ajit Pawar : खातेवाटपचा निर्णय राष्ट्रवादीच्या बाजूने - बच्चू कडू
  2. Bachchu Kadu On CM : मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर भूमिका जाहीर करणार - आमदार बच्चू कडू
  3. Prahar Jan Shakti Party : प्रहार जनशक्ती पक्षाची अमरावती लोकसभा मतदारसंघावर नजर
Last Updated :Jul 24, 2023, 4:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.