ETV Bharat / state

'त्या' पुस्तकाची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करणार - गृहमंत्री

author img

By

Published : Jan 13, 2020, 2:50 PM IST

छत्रपती शिवाजी महाराज यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी तुलना करणारे पुस्तक भाजपने प्रकाशीत केले आहे. यावरुन चांगलेच वादंग निर्माण झाले आहे. यासंदर्भात योग्य ती माहिती घेऊन, कारवाई करणार असल्याचे वक्तव्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.

Home Minister Anil Deshmukh
गृहमंत्री अनिल देशमुख

अमरावती - छत्रपती शिवाजी महाराज यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी तुलना करणारे पुस्तक भाजपने प्रकाशीत केले आहे. यावरुन चांगलेच वादंग निर्माण झाले आहे. यासंदर्भात योग्य ती माहिती घेऊन, कारवाई करणार असल्याचे वक्तव्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.

गृहमंत्री अनिल देशमुख


रविवारी दिल्लीत आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक भाजपचे नेते जय भगवान गोयल यांनी लिहले आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर सर्वच स्तरातून भाजपवर टीका होत आहे. यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही प्रतिक्रिया दिली. या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले आहे. त्या पुस्तकातून धार्मिक भावना दुखवण्याचा प्रयत्न होतोय का? याची सविस्तर माहिती घेऊन योग्य ती कारवाई करु, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

Intro:आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाची चौकशी करून योग्य कारवाई करणार -गृहमंत्री अनिल देशमुख.

अमरावती अँकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करत आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाचे प्रकाशन काल दिल्लीत भाजपच्या एका नेत्याने केल्यानंतर त्यावर देशभरातून टीका होत असून ते पुस्तक बंद करायची मागणी होत आहे.दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना शिवाजी महाराज यांच्याशी केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे.त्याची मी योग्य ती माहीती घेतो.त्या पुस्तकाचे प्रकाशन कुणी केले.त्या पुस्तकातून धार्मिक भावना दुखवण्याचा प्रयत्न होतोय का यांची सविस्तर माहिती घेऊन योग्य ती कारवाई करू अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी etv भारतशी बोलताना दिली.Body:अमरावतीConclusion:अमरावती

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.