ETV Bharat / state

अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणांची स्ट्राँग रूमला भेट

author img

By

Published : Apr 19, 2019, 11:54 PM IST

नवनीत राणा यांनी आज स्ट्रॉंग रूमला भेट दिली. याठिकाणी २ हजार ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या आहेत.

नवनीत राणा निवडणूक अधिकाऱ्यांशी बोलताना

अमरावती - लोकसभा मतदार संघात महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी आज अमरावती-बडनेरा मार्गावर स्थित नेमाणी गोडाउन येथील स्ट्राँग रूमला भेट दिली.

नवनीत राणा

अमरावती मतदार संघातील सर्व २ हजार ईव्हीएम मशीन नेमाणी येथील गोडाउनमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. तर मेळघाटातील अतिदुर्गम मतदान केंद्रांवरील ईव्हीएम सायंकाळपर्यंत नेमाणी गोडाउन येथील स्ट्राँग रूममध्ये पोहोचणार होत्या. मात्र, आज दुपारी नवनीत राणा यांनी स्वतः स्ट्राँग रूमला भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याशी त्यांनी चर्चा केली.

स्ट्राँग रूमला भेट दिल्यावर राणा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माझ्यासाठी मेहनत घेणाऱ्या खेड्यापासून शहरातील सर्व कार्यकर्ते आणि महिलांचे आभार मानले. तसेच स्ट्राँग रूमच्या सुरक्षेसाठी तैनात सुरक्षा रक्षकांचेही विचारपूस करत आभार व्यक्त केले.

Intro:अमरावती लोळसभा मतदार संघात महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी आज अमरावती - बडनेरा मार्गावर स्थित नेमाणी गोडाऊन येथील स्ट्रॉंग रूमला भेट दिली.


Body:अमरावती मतदार संघातील सर्व 2 हजार मतदार संघातील ईव्हीएम नेमाणी गोडाऊन मध्ये ठेवल्या जात आहे. मेळघाटातील अतिदुर्गम मतदान केंद्रांवरील ईव्हीएम सायंकाळ पर्यंत नेमाणी गोडाऊन येथील स्ट्रॉंग रूम मध्ये पोचणार आहेत. आज दुपारी नवनीत राणा यांनी स्वतः स्ट्रॉंग रूमला भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याशी त्यांनी चर्चा केली. स्ट्रॉंग रूमला भेट दिल्यावर नवनीत राणा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माझ्या साठी मेहनत घेणेय खेड्यापासून शहरातील सर्व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करते. भर उन्हात महिलांनी मतदान केले त्यांचेही आभार व्यक्त करते असे नवनीत राणा म्हणाल्या. स्ट्रॉंग रूम येथे सुरक्षेसाठी तैनात सुरक्षा राक्षकांचेही नवनीत राणा यावेळो आभार व्यक्त केले.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.