ETV Bharat / state

चांदूरबाजारमध्ये 46 किलो गांजा जप्त, 5 आरोपींना अटक

author img

By

Published : Dec 19, 2020, 3:50 PM IST

जिल्ह्यातील चांदूर बाजारमध्ये गांजाचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, आरोपींकडून दोन दुचाकींसह 6 लाख 15 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

46 kg Hemp seized in Chandurbazar
चांदूरबाजारमध्ये 46 किलो गांजा जप्त

अमरावती - जिल्ह्यातील चांदूर बाजारमध्ये गांजाचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, आरोपींकडून दोन दुचाकींसह 6 लाख 15 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

चांदूरबाजारमध्ये 46 किलो गांजा जप्त

पाच आरोपींना अटक

अमरावती गुन्हे शाखेला चांदूरबाजारात मोठ्या प्रमाणात गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने चांदूरबाजार पोलिसांच्या सहकार्याने नाकाबंदी केली. यादरम्यान दोन दुचाकीस्वारांकडे गांजा असल्याचे आढळून आले. त्यांचाकडून 46 किलो 300 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. सुरज अविनाश शेळके ४० चांदूरबाजार, जावेदअली मिरअली ३० कसाबपुरा चांदूरबाजार, शेख वसीम शेख करीम २७ अन्सार नगर अमरावती, कृष्णा रामदास गोंड २२, व दिपक अर्जुन नेमाडे ३० दोघे रा.कुर्‍हा काकडा मुक्ताईनगर जळगाव असे या आरोपींचे नावे आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.