ETV Bharat / state

वेतन द्या! ..अन्यथा शिक्षण विभागासमोर पत्नीसह आत्महत्या करेन

author img

By

Published : Mar 5, 2020, 9:29 AM IST

Updated : Mar 5, 2020, 9:45 AM IST

पिंजर बार्शीटाकळी अकोला
वेतन रखडल्याने शिक्षकाचा आत्महत्या करण्याचा इशारा

अनुदानित शाळेमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करत असताना शाळा संस्थाचालक व सचिवांनी वेतन रोखून धरले. यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागच त्यांना मदत करत आहे. असे सांगत प्रविण चव्हाण यांनी वेतन मिळत नसेल तर आपण पत्नीसह शिक्षण विभागासमोर आत्महत्या करू, असा इशारा शिक्षणाधिकाऱ्यांना दिला.

अकोला - बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथे प्रविण चव्हाण प्राथमिक शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून काम करत आहेत. 2015 पासून त्यांचे वेतन रोखले गेले आहे. त्यामुळे त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र, वेतन न निघाल्यामुळे प्रविण चव्हाण यांनी पत्नीसह जिल्हा परिषद शिक्षण विभागात गोंधळ घातला. तसेच आत्महत्या करण्याचा इशाराही दिला. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने प्रकरण शांत करण्यात आले.

शिक्षक पतीचा पत्नीसह जिल्हा परिषद शिक्षण विभागात गोंधळ; वेतन न दिल्यामुळे शिक्षण विभाग व संस्थाचालकांवर केला आरोप

हेही वाचा... ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना तातडीने १० लाख देण्याचे शासनाचे आदेश

अनुदानित शाळेमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करत असताना शाळा संस्थाचालक व सचिवांनी वेतन रोखून धरले. यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागच त्यांना मदत करत आहे, असे सांगत प्रविण चव्हाण यांनी वेतन मिळत नसेल तर आपण पत्नीसह शिक्षण विभागासमोर आत्महत्या करू असा इशारा शिक्षणाधिकाऱ्यांना दिला.

बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथे प्रविण गणेश चव्हाण हे शामकी माता प्राथमिक शाळेत सहायक शिक्षक म्हणून काम करत आहेत. त्यांना वेतनश्रेणी लागु झाली. त्यानंतर संस्था सचिवांनी त्यांना दहा लाख रुपयांची आगावू मागणी केली असल्याचे ते सांगत आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने ही मागणी ते पूर्ण करू शकले नाही. त्यामुळे संस्था सचिवांनी त्यांचे वेतन थांबवण्यासाठी शिक्षण विभागात अर्ज केला. हा अर्ज मंजूर झाल्याने त्यांचे 2015 पासून वेतन मिळाले नाही, असे प्रविण चव्हाण यांनी सांगितले. तसेच याबाबत शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा... मुलामुळे आईची ओळख व्हावी असे वाटते, रोहितने माझे ते स्वप्न पूर्ण केले - सुनंदा पवार

विभागीय शिक्षण अधिकारी यांच्याकडे चव्हाण यांना तक्रार केली. तसेच त्यांनी न्यायालयात देखील धाव घेतली. याबाबतची सुनावणी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांकडे सुरू आहे. दरम्यानच्या काळात संस्था सचिवांनी दुसऱ्या व्यक्तीस सहाय्यक शिक्षक म्हणून नेमणूक दिली. तरीही ते न्याय मिळवण्यासाठी शिक्षण अधिकारी यांच्याकडे येत असताना, यावर कोणताही निर्णय होत नसल्याने त्यांनी पत्नीसह जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात येऊन गोंधळ घातला. तसेच वेतन न दिल्यास आत्महत्या करेल, असा इशारा दिला. पोलिसांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत केले. मात्र, या दोघांच्या गोंधळामुळे शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी चांगले घाबरले होते.

Last Updated :Mar 5, 2020, 9:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.