ETV Bharat / state

मित्राने केला मित्राचा खून, अनैसर्गिक संबंधाची केली होती मागणी

author img

By

Published : Jun 20, 2021, 10:21 PM IST

अकोला येथे एकत्र राहत असलेल्या मित्रानेच दुसऱ्या मित्राचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना आज उघडकीस आली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलास न्यायालयाने बालसुधारगृहात पाठवले आहे.

सिव्हिललाईन पोलीस स्टेशन
सिव्हिललाईन पोलीस स्टेशन

अकोला - नीट परीक्षेच्या तयारीसाठी अकोल्यात दोन मित्र राहायला आले होते. ते एकत्र राहत होते. त्यातील एकाने दुसऱ्या मित्राचा गळा आवळून खून केल्याची घटना आज उघडकीस आली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलास न्यायालयाने आज बालसुधारगृहात पाठवले आहे. प्रतीक लवंगे असे मृताचे नाव आहे.

अकोल्यात मित्रानेच केला मित्राचा खून

दोघे खासगी कोचिंग क्लासमध्ये शिकत होते -

बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील दोन अल्पवयीन मित्र हे लहानपणापासून एकत्रच शिक्षण घेत होते. ते अकोल्यात नीटची तयारी करण्यासाठी अकोल्यातील शास्त्री नगर येथे रहायला आले होते. खासगी कोचिंग क्लासमध्ये त्यांनी प्रवेश घेतला होता. संचारबंदी संपल्यानंतर ते सोमवारी अकोल्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी मित्र प्रतीक लवंगे याचा मित्राने गळा आवळून खून केला आहे. याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अनैसर्गिक कृत्यास नकार दिल्याने केला खून

सिव्हिल लाईनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश वाघमारे या प्रकरणाचा तपास करीत आहे. अनैसर्गिक कृत्यास नकार दिल्याने, ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस तपासात आणि खून करणाऱ्या मुलाच्या जबाबातून ही घटना समोर आली आहे. खून करणाऱ्या अल्पवयीन मुलास पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला बालसुधारगृहात पाठवले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.