ETV Bharat / state

Sushma Andhare News: संजय राऊत यांचे व्यक्तव्य भाजपलाच का झोंबले- सुषमा अंधारे

author img

By

Published : Mar 3, 2023, 8:30 AM IST

शिवगर्जना सप्ताहानिमित्ताने आज शिवसेनेच्या नेत्या उपनेत्या सुषमा अंधारे या अकोल्यातील उमरी येथील सभेत बोलत होत्या. त्यांनी सर्वोच्च न्यायालय, कसबा आणि चिंचवड येथील निवडणूक निकालावर भाष्य केले. संजय राऊत यांनी केलेल्या भाष्यवर बोलताना त्यांनी भाजपलाच का त्यांचे व्यक्तव्य झोंबले आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Sushma Andhare
सुषमा अंधारे

अकोला : सुषमा अंधारे म्हणाल्या, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने आम्ही अत्यंत समाधानी आहोत. या निर्णयाने आम्ही आनंदीत झालो आहे. निवडणूक आयोगाची यंत्रणा अत्यंत निःपक्ष असली पाहिजे. इथे निःपक्षपातीने काम झाले पाहिजे. शिवसेनेच्या संदर्भात आणि महाराष्ट्र यांच्या संदर्भात निवडणूक आयोगाने जो निकाल दिला. तो अत्यंत पक्षपाती निकाल होता. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु, आज निवडणूक आयोगाच्या निवडीसाठी त्रिस्तरीय समिती स्थापन केली पाहिजे, हा निर्णय न्यायव्यवस्थेवर दृढ विश्वास निर्माण करणारा आहे, असे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली आहे.



तिहेरी लढतीमुळे हा तोटा : पुढे त्या म्हणाल्या, पिपरी चिंचवडची लढत ही तिहेरी होती. तिहेरी लढतीमुळे हा तोटा झालेला आहे. जर ही लढत दुहेरी असती, तर कदाचित ही जागा महाविकास आघाडीला मिळाली असती. कसब्याच्या निवडणुकीत चारवेळा स्टँडिग कमिटीचे चेअरमन असलेले नासाने यांच्या विजयासाठी देवेंद्र फडणवीस यांनी अर्ध्यापेक्षा जास्त मंत्रिमंडळ यांनी या निवडणुकीत उतरविले होते. तब्बल चार टर्म भाजपचा बालेकिल्ला असलेली ही जागा आज भाजपच्या हातातून जातेय, मला असे वाटते ओरिजिनल शिवसेना त्यांच्यासोबत होती. तोपर्यंत त्यांचा विजय होत होता. आज ओरिजिनल शिवसेना महाविकास आघाडीबरोबर आहे, त्यामुळे हा विजय झाला आहे. हा कौल लोकांच्या मनामध्ये भाजपबद्दल अत्यंत रोष आहे. लोकं चिडलेले आहे, आणिलोकांचा जनमताचा जो ट्रेंडीग आहे, मतदानाच आणि हे ट्रेंडीग महाविकास आघाडीच्या बाजूने वळत आहे, हे स्पष्ट दिसत आहे, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाले.

हक्कभंगाची आज आठवण कशी झाली : राऊत जेव्हा चोरमंडळ म्हणाले, ज्या लोकांना झोम्बलेले आहे, त्यात सगळे भाजपचेच का बरे आहे? हा मला प्रश्न पडतो. 'अगर मैने चोर के दाढीने तिनका कहा, तो जो चोर होंगा वही अपनी दाढी टटोलेंगे ना, तो ये अपनी दाढी क्यू टटोल रहे है?' हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. हक्कभंगांची भाषा जेव्हा हे लोक करतात, तेव्हा माझा प्रश्न आशिष शेलार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना आहे की, कोश्यारीजी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बेताल व्यक्तव्य करीत होते, मंगलप्रसाद लोंढा, प्रसाद लाड बोलत होते, तेव्हा साधा निदांजनक प्रस्ताव ही देवेंद्र फडणवीस यांनी मांडला नाही, हक्कभंग प्रस्ताव लांबच राहिला. त्यांना आज हक्कभंगाची आज आठवण कशी झाली?

निकाल हातातून गेला : देशद्रोही लोकांना म्हटलेले तुम्हाला चालते. तेव्हा हक्कभंगाचा प्रस्ताव आणला जात नाही. तेव्हा मला वाटते की, भाजपचे जे काही आहे ना, ते उरफोड आहे. निष्कारण हे ऊरफोड चालले आहे. देवेंद्र फडणवीस सध्या विधान परिषदेच्या पाच जागांचा निकाल हातातून गेला आहे. आता कसब्याच्या जागा गेली आहे. यामुळे ते बऱ्यापैकी निराश झाले असतील, म्हणून हे झाले असेल अशा त्या म्हणाल्या.


पालकमंत्री यांच्यावर वर्कलोड : जिल्हा प्रमुख गोपाल दातकर सांगत होते की, पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे अकोल्यात फटकलेच नाही. त्यांच्यावर जास्त वर्कलोड आहे. मग त्यांनी वर्कलोड कमी करावा. मंत्री बनण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार करावा. कोणीही चांगला नसेल तर त्यांनी राणेंच्या बारक्या पोरांना मंत्र्यांची संधी द्या, असा टोला ही शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मारला. उमरी येथील शिवगर्जना सप्ताहमध्ये शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमात जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, मुकेश मुरूमकार, मंगेश गावंडे, देवश्री ठाकरे, विजय दुतंडे, अतुल पवणीकर, राहुल कराळे यांच्यासह आदी ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.


हेही वाचा : Maharashtra Budget Session 2023: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पाचवा दिवस; राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री देणार उत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.