ETV Bharat / state

Farmer Suicide : कर्ज काढून पेरणी केलेल्या पिकांचे नुकसान; महिलेसह दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

author img

By

Published : Oct 26, 2022, 12:08 PM IST

Updated : Oct 26, 2022, 12:45 PM IST

अकोल्यात शोतकऱ्याची आत्महत्या दिवाळीच्या सणात शोतकऱ्याची आत्महत्या ( Farmer suicide in Akola ) कर्ज काढून पिकांची पेरणी केली होती. मैनाबाई जाधव व बाबुसिंग चव्हाण या दोघांकडे प्रत्येकी तीन एकर शेती आहे. दोघांनीही कर्ज काढून यंदा विविध पिकांची पेरणी ( Crops sown by taking loan ) केली. परंतू, अतिवृष्टीने सोयाबीन व इतर पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात खर्च झाल्याने कर्जाची परतफेड कशी होईल याची चिंता त्या दोघांना होती

Farmer Suicide
शेतकऱ्यांची आत्महत्या

अकोला : पातूर तालुक्यातील चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या झरंडी व गावंडगाव येथे महिलेसह दोन अल्पभूधारक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना 25 सप्टेंबर रोजी ( Farmer suicide in Akola ) घडली. बाबुसिंग हंजारी चव्हाण (वय 55 वर्ष, रा. झरंडी) आणि मैनाबाई गजानन जाधव (45, रा. गावंडगाव) असे आत्महत्या करणाऱ्यांची नावे आहेत. ऐन दिवाळीच्या दिवसात झालेल्या या घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत (Farmer suicide in Diwali ) आहे.

कर्ज काढून पिकांची पेरणी : मैनाबाई जाधव व बाबुसिंग चव्हाण या दोघांकडे प्रत्येकी तीन एकर शेती आहे. दोघांनीही कर्ज काढून यंदा विविध पिकांची पेरणी ( Crops sown by taking loan ) केली. परंतू, अतिवृष्टीने सोयाबीन व इतर पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात खर्च झाल्याने कर्जाची परतफेड कशी होईल याची चिंता त्या दोघांना होती. त्याच विवंचनेतून या दोघांनी आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. गावंडगाव येथील मृतक मैनाबाई जाधव यांनी विहिरीत उडी घेऊन तर झरंडी येथील बाबूसिंग चव्हाण यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार योगेश वाघमारे व सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी पंचनामा केला.

अहवाल शासनाकडे पाठविणार : दरम्यान, तहसीलदार बाजड यांनी सांगितले की, झरंडी व गावडगाव येथे आत्महत्या झाल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर तलाठी, मंडळ अधिकारी यांना पाठविण्यात आले आहे. त्यांनी चौकशी केली असून शेतकरी आत्महत्या असल्यास याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येईल, असे तहसीलदार बाजड यांनी सांगितले.

उस्मानाबादेत शेतकऱ्यांची आत्महत्या : उस्मानाबादेत तीन वेळा सोयाबीनची पेरणी करुन देखील सोयाबिनला उतार मिळाला नाही. त्यामुळे उस्मानाबाद तालुक्यातील लासोना येथील अल्पभुधारक शेतकरी सल्लाउद्दीन गुलाब शेख हे निराश होते. लोकांचे कर्ज फेडायचे कसे या विवंचनेतून त्यांनी झाडाला गळफास घेऊन आयुष्य ( Farmers suicide in Diwali ) संपविले . उस्मानाबाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन करूनही शेतकऱ्यांना धीर मिळाला नव्हता. उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्याने ऐन दिवाळीत आत्महत्या केली आहे. सल्लाउद्दीन गुलाब शेख असे आत्महत्या केलेल्या ( Osmanabad farmer suicide ) शेतकऱ्याचे नाव आहे. १ एकर शेतामध्ये ३ वेळा सोयाबिनची पेरणी उस्मानाबाद जिल्हयात सतत पडणारा पाऊस ( Farmers suicide in Diwali ) आणि सोयाबीनवर आलेल्या शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव आणि यलो मोझँकच्या अटँकमुळे शेतकरी अडचणीत आहेत. सोयाबिनचा उतार कमी आला आहे. सल्लाउद्दीन शेख यांची स्वतःची एक एकर जमीन होती. आपली जमीन कसून ते दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणुन कामाला होते. सल्लाउद्दीन यांनी त्यांच्या १ एकर शेतामध्ये ३ वेळा सोयाबिनची पेरणी केली होती. परंतु सतत पडणारा पाऊस शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव आणि यलो मोझँकचा अटँक यामुळे सोयाबिनवर वाईट परिणाम होऊन कमी उतार मिळाला.

Last Updated : Oct 26, 2022, 12:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.