ETV Bharat / state

मनपा सभेत ‘गुंठेवारी’चा गोंधळ; भाजप-शिवसेना पुन्हा आमने-सामने

author img

By

Published : Sep 30, 2020, 8:23 PM IST

Updated : Sep 30, 2020, 10:27 PM IST

गुंठेवारीच्या विषयाभोवती गुंतलेल्या सभेत पहिल्याच विषयापासून शिवसेना नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने आणि नगर सचिवांची फाईल पळविल्याने महापौर अर्चना जयंत मसने यांनी विषय सूचीवरील विषय मंजूर करीत राष्ट्रगीत सुरू केले.

अकोला
अकोला

अकोला - महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पुन्हा एकदा वादळी ठरली. सलग तिसऱ्या सभेत वादळी चर्चेत विषयांना मंजुरी देत सभा गुंडाळण्याचा प्रकार बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित सभेत घडला. गुंठेवारीच्या विषयाभोवती गुंतलेल्या सभेत पहिल्याच विषयापासून शिवसेना नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने आणि नगरसचिवांची फाईल पळविल्याने महापौर अर्चना जयंत मसने यांनी विषय सूचीवरील विषय मंजूर करीत राष्ट्रगीत सुरू केले.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ

मागील सभेच्या नावाखाली मंजूर करण्यात आलेल्या विषयांची सभेत माहिती देण्याच्या मागणीवरून शिवसेना गटनेते राजेश मिश्रा व सत्ताधारी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी महापौर विजय अग्रवाल यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर शिवसेनेसह विरोध पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे सदस्य महापौरांपुढे एकत्र झाले. त्यातून सत्ताधारी विरुद्ध विरोधक अशी घोषणा बाजी सुरू झाली. विषय पत्रिकेवर गुंठेवारीच्या प्रकरणाची चौकशी करण्याचा विषय होता. त्यात शिवसेनेचे लोक अडकणार असल्याच्या भीतीने शिवसेना गटनेते व नगरसेवकांनी गोंधळ घालून त्यांच्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते विजय अग्रवाल यांनी केला. शिवसेना गटनेते राजेश मिश्रा यांनी बहुमताच्या जोरावर भाजप कोणतेही विषय मंजूर करून घेत आहे. ज्याची सभागृहात चर्चा झाली नाही, विषय पत्रिकेवर विषय नव्हते तेही वेळेवरचे विषय दाखवून मंजूर केले आहेत. त्याची माहिती सभागृहात देण्याचे टाळण्यासाठी व आपले हित साध्य करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी ही सभा गुंडाळल्याचा आरोप केला.

हेही वाचा - अमृत योजनेची कामे पूर्ण करा; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मोबाईल टॉवरवर चढून सिनेस्टाइल आंदोलन

विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण यांनी सत्ताधारी भाजप व शिवसेना यांची मिलीभगत असून सर्वसामान्यांच्या विषयांकडे दुर्लक्ष करीत सभेत गोंधळ घालून आपल्या हिताचे विषय मंजूर करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप भाजप व शिवसेनेवर केला. वंचित बहुजन आघाडीच्या गटनेत्या ॲड. धनश्री देव यांनी सत्‍ताधारी व शिवसेनेचे साटेलोटे असल्याने इतर सदस्यांच्या हक्कावर गदा आणली जात असल्याचा आरोप केला. महिला नगरसेवकांना त्यांचे प्रश्न मांडण्याचा व महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यापासून वंचित ठेवण्यासाठी भाजप व शिवसेनेचे काही नगरसेवक हातमिळवणी करून काम करीत असल्याचा आरोप केला.

Last Updated : Sep 30, 2020, 10:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.