ETV Bharat / state

झेंडूच्या फुलांना मिळतोय कवडीमोल भाव; अतिवृष्टीमुळे फूल उत्पादक संकटात

author img

By

Published : Oct 15, 2022, 4:05 PM IST

यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे (heavy rain in maharashtra) झेंडूच्या फुलांना (zendu flower) सध्या कवडीमोल भाव मिळतो आहे. त्यामुळे आता फूल उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. (flower farmers in trouble).

झेंडूची बाग
झेंडूची बाग

संगमनेर: संगमनेर तालुक्याच्या पठारी भागातील अनेक शेतकर्‍यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात झेंडू फुलाची लागवड केली होती. मात्र यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे (heavy rain in maharashtra) झेंडूच्या फुलांना (zendu flower) सध्या कवडीमोल भाव मिळतो आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील फूल उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. (flower farmers in trouble).

बाळासाहेब करंजेकर, झेंडू उत्पादक
झेंडूची बाग
झेंडूची बाग

परतीच्या पावसाचाही फटका: संगमनेर तालुक्यातील खंदरमाळ गावांतर्गत असलेल्या करंजेकर मळा येथे बाळासाहेब करंजेकर यांनी आपल्या दीड एकर क्षेत्रात झेंडूची लागवड केली आहे. त्यासाठी त्यांनी साधारण एक लाख रुपयांच्यावर खर्च केला. दसर्‍याच्या दोन तीन दिवस आधी फुले येणे चालू झाली. सुरुवातीला एका तोड्याला पन्नास रुपये किलोचा भाव मिळत होता, मात्र त्यानंतर तो भाव दहा ते पाच रुपयां पर्यंत घसरला. यावर्षी झालेल्या परतीच्या पावसामुळे फुलांमध्ये पाणी साचून फुले काळी पडत आहे. परिणामी आता फुलांवर झालेला लाखोंचा खर्च वसूल होती की नाही, असा प्रश्न शेतकरी करंजेकर यांना सतावू लागला आहे.

झेंडूची बाग
झेंडूची बाग

दसरा व दिवाळीच्या काळात झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. मात्र ऐन सणासुदीत शेतकर्‍यांना आता नुकसानीचा सामना करावा लागण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. अतिवृष्टीमुळे पिकांमध्ये पाणी साचल्याने पिके सडू लागली आहेत. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी झेंडूची झाडे उपटून टाकली आहेत.

झेंडूची बाग
झेंडूची बाग
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.