ETV Bharat / state

शिर्डीत असाही एक विवाहा सोहळा, फक्त सव्वा रुपयात लावले जाते लग्न

author img

By

Published : Jun 4, 2022, 8:02 PM IST

लाखो रुपयांची उधळपट्टी करुन लग्नाचा डामडौल साजरा करण्यापेक्षा सामुदायिक विवाह सोहळयात अल्प खर्चात मुलामुलींचे विवाह लावता येतात. घराण्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न येत नाही आणि मानपानाचाही. शिर्डीत कैलासबापू कोते व सुमित्राताई कोते या सामाजिक क्षेत्रातील कुटुंबाने उपक्रम सुरू केला आहे. गेली 21 वर्षे तो अखंडपणे सुरू आहे. आता पर्यंत 2000 जोडप्यांचे शुभमंगल पार पडले असून या सर्व जोडप्यांचे कन्यादान स्वतः कोते कुटुंबाने केले आहे.

wedding is held for 1 rs in shirdi
शिर्डीत असाही एक विवाहा सोहळा

शिर्डी (अहमदनगर) - गेल्या 21 वर्षा पासुन शिर्डीत सामुदायीक विवाह सोहळ्याची मोठी चळवळ उभी राहीली असुन आज पर्यंत 2000 विवाह पार पडले आहेत. सर्व धर्मीयांच्या या सामुदायीक विवाह सोहळ्यात शिर्डीतील ग्रामस्थ सर्व जबाबदारी लिलया पार पाडतात. सर्वसमान्य कुटुबातील वधु-वरांच लग्न अगदी शाही थाटात पार पाडण्यात येते. या मध्ये 19 जोडपे विवाह बंधनात अडकले. शाहीथाटात पार पडलेल्या या सामुदायीक विवाह सोहळ्यासाठी हजारो वऱ्हाडी मंडळी सह साधुसंत आणि राजकारण्यांनी हजेरी लावली होती. विवाह बंधनात अडकलेल्या वधु-वरांना साई सिध्दी चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने संसार उपयोगी साहीत्य भेट स्वरुपात देण्यात आलेय.

सामुदायिक विवाह - पावसाळयात, पाऊस पडल्यावर सर्वच वनस्पती तरारुन उठतात तसा माणुसकीचा पाऊस सर्वत्र पडला तर प्रत्येक मनुष्य हा ‘माणूस’ म्हणून उभा राहील. माणुसकीची ही मुहूर्तमेढ म्हणजेच ‘सामुदायिक विवाह’ होय असे मानायला हरकत नाही. लाखो रुपयांची उधळपट्टी करुन लग्नाचा डामडौल साजरा करण्यापेक्षा सामुदायिक विवाह सोहळयात अल्प खर्चात मुलामुलींचे विवाह लावता येतात. घराण्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न येत नाही आणि मानपानाचाही. शिर्डीत कैलासबापू कोते व सुमित्राताई कोते या सामाजिक क्षेत्रातील कुटुंबाने उपक्रम सुरू केला आहे. गेली 21 वर्षे तो अखंडपणे सुरू आहे. आता पर्यंत 2000 जोडप्यांचे शुभमंगल पार पडले असून या सर्व जोडप्यांचे कन्यादान स्वतः कोते कुटुंबाने केले आहे.

सव्वा रुपयात लग्न - सर्व धर्मियांचे श्रद्धा स्थान,अशी देश-विदेशात ओळख निर्माण झालेल्या साईबाबांची शिर्डी या धार्मिक स्थळी दरवर्षी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह आयोजित करण्यात येतात. अवघ्या ‘सव्वा रुपयात लग्न’ करण्याची सोय असलेला हा सामाजिक उपक्रम पैशाअभावी रखडलेल्या गोर-गरीब कुटुंबातील उपवर मुला-मुलीसाठी मोठा आधार बनला आहे. महारष्ट्रातीलच नव्हे तर इंतर राज्यातील गरीब कुटुंबातील उपवर मुले-मुली येथे येऊन लग्न लावतात.

2 विवाह बौद्ध धम्म पध्दतीने - यंदाच्या सर्वधर्मिय सामुदायिक विवाहसोहळ्यास प्रथम 2 विवाह बौद्ध धर्म पध्दतीने निकम आणी गोडगे यांनी मंत्रोच्चार म्हणून पार पाडले. त्यानंतर उर्वरित 19 जोडप्यांचे विवाह हिंदू धर्म पध्दतीने पार पडले असून याचे पौराहित्य लावर गुरुजी यांनी केले. यामध्ये राजस्थान येथील एक जोडपे विवाहबद्ध झाले असल्याची माहिती साईसिध्दी चँरिटेबल ट्रस्टच्या वतीने देण्यात आली. वधूवरांना कैलासबापू कोते आणि सुमित्राताई कोते यांच्या हस्ते कन्यादान करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.