ETV Bharat / state

राळेगणसिद्धीमध्ये भाजप नेत्यांची धावपळ; अण्णा हजारे उपोषणावर ठाम..!

author img

By

Published : Jan 22, 2021, 6:44 PM IST

दिल्लीच्या सीमांवर अगोदरच कृषी कायदे मागे घ्यावेत, यासाठी दीर्घ आंदोलन एकीकडे सुरू असताना आता अण्णा हजारेही आंदोलन करणार असल्याने भाजप नेत्यांच्या गोटात काहीशी अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर अण्णांची मनधरणी करून त्यांनी आंदोलन करू नये, म्हणून भाजपचे राज्यातील नेते एक दिवसाआड राळेगणसिद्धी वारी करताना दिसत आहेत.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

अहमदनगर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे येत्या ३० जानेवारीपासून आपल्या राळेगणसिद्धी गावात विविध कृषी मागण्यांसाठी बेमुदत उपोषण करणार आहेत. हे उपोषण केंद्र सरकार विरोधात आहे. दिल्लीच्या सीमांवर अगोदरच कृषी कायदे मागे घ्यावेत, यासाठी दीर्घ आंदोलन एकीकडे सुरू असताना आता अण्णा हजारेही आंदोलन करणार असल्याने भाजप नेत्यांच्या गोटात काहीशी अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर अण्णांची मनधरणी करून त्यांनी आंदोलन करू नये, म्हणून भाजपचे राज्यातील नेते एक दिवसाआड राळेगणसिद्धी वारी करताना दिसत आहेत. आजही (शुक्रवारी) आमदार राधाकृष्ण विखे-पाटील हे राळेगणमध्ये पोहचले असून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हेदेखील येत आहेत.

अहमदनगर

अण्णा आंदोलनावर ठाम..!

काँग्रेस काळात अण्णांनी लोकपालसाठी दोनदा आंदोलन केले. २०११ आणि २०१३ साली केलेल्या आंदोलनाच्या वेळी त्यावेळी विरोधात असलेल्या भाजप नेत्यांनी अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देत संसदेत काँग्रेस विरोधात मोठी राळ उडवली होती. त्यावेळी अण्णांचे कौतुक करणारी भाजप आता केंद्रात सत्तेत आहे, मात्र आता आश्वासन पूर्तता दूरच राहिली, आमच्या पत्रांना पंतप्रधान मोदी, कृषीमंत्री साधे उत्तरही देत नाहीत, अशी खंत अण्णांनी व्यक्त केली. तसेच आंदोलनासाठी रामलीला मैदान उपलब्ध करून दिले जात नाही, असे सांगत केंद्र सरकार द्वेष भावनेने आपल्याशी वागत असल्याचेही अण्णांनी उद्वेगाने सांगितले आहे. त्यामुळेच कदाचित अण्णा आणि अण्णांनावर प्रेम करणाऱ्या राळेगणसिद्धी परिवार दिल्लीत आंदोलन न करता राळेगणसिद्धीमध्येच आंदोलन करण्याच्या निर्णयापर्यंत आलेला असावा.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.