ETV Bharat / state

जिल्हा-तालुका पातळीवर अहिंसेच्या मार्गाने आंदोलन होणार - अण्णा हजारे

author img

By

Published : Jan 29, 2021, 4:10 PM IST

Updated : Jan 29, 2021, 5:28 PM IST

अण्णा हजारे उद्या 30 जानेवारीला महात्मा गांधींच्या पुण्यतिथीपासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करत आहेत. याचे नियोजन करण्यासाठी आज (शुक्रवारी) राळेगणसिद्धीमध्ये अण्णांनी आपल्या प्रमुख सहकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

अहमदनगर

अहमदनगर - आपल्या कृषीविषयक मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उद्या 30 जानेवारीला महात्मा गांधींच्या पुण्यतिथीपासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करत आहेत. याचे नियोजन करण्यासाठी आज (शुक्रवारी) राळेगणसिद्धीमध्ये अण्णांनी आपल्या प्रमुख सहकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत प्रामुख्याने आंदोलनाचे स्वरूप ठरवण्यात येत असून कार्यकर्त्यांनी राळेगणसिद्धीमध्ये येऊन आंदोलनात सहभागी होऊ नये, असे आवाहन करताना त्या ऐवजी आपापल्या जिल्हा किंवा तालुक्याच्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

अहमदनगर
दरम्यान, अण्णांनी आंदोलन करू नये म्हणून केंद्र सरकार आणि राज्यातील भाजप नेते युद्ध पातळीवर प्रयत्न करत असून त्याचाच एक भाग म्हणून आज शुक्रवारी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे-पाटील आदी नेते राळेगणसिद्धीमध्ये येत आहेत. अण्णांच्या मागण्यांवर एक प्रस्ताव माजीमंत्री गिरीश महाजन यांनी कालच सादर केला असून आज थेट केंद्रीय कृषी राज्यमंत्री हे त्यावर केंद्र सरकारच्या वतीने चर्चा करून मार्ग काढण्यासाठी येत आहेत. सरकारच प्रयत्न आहे की अण्णांनी आंदोलन न करता चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवला जावा.

केंद्रीय नेते, भाजप नेते भेटीला

अण्णांनी आंदोलन करू नये, यासाठी आता केंद्र सरकार पातळीवर प्रयत्न सुरू झाले असून त्याचाच एक भाग म्हणून आज दुपारनंतर केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी स्वतः अण्णांशी बोलण्यासाठी राळेगणसिद्धीमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबत राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस, माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन आदी नेते त्यांच्यासोबत आहेत. एकंदरीत केंद्र सरकारने अण्णांनी आंदोलन करू नये यासाठी प्रयत्न सुरू केले असून त्यासाठीचा एक प्रस्ताव घेऊन केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी आज राळेगणसिद्धीमध्ये आलेले असून अण्णांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सध्या बैठकीमध्ये सुरू आहे.

आत्तापर्यंत भारतीय जनता पक्षाचे राज्यातील अनेक नेते राळेगणसिद्धीमध्ये येऊन गेलेले असताना सर्वांनी भेटीत चर्चा केली. मात्र, आपण आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचे प्रत्येक वेळी अण्णांनी सांगितले आहे. त्यामुळे आज केंद्रीय कृषी राज्यमंत्री अण्णा हजारे यांच्या भेटीसाठी राळेगणसिद्धीमध्ये बोलणी करण्यासाठी आल्यानंतर अण्णांची भूमिका आंदोलनाबाबत काय असेल याबाबत सध्या उत्सुकता आहे.

Last Updated : Jan 29, 2021, 5:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.