ETV Bharat / state

ओबीसी आरक्षणात ढवळाढवळ न करता मराठ्यांना आरक्षण द्या - जयदत्त क्षीरसागर

author img

By

Published : Feb 7, 2021, 4:55 PM IST

ओबीसींचे आरक्षण कमी न करता किंवा ओबीसी आरक्षणात ढवळाढवळ न करता त्यांना आरक्षण द्यावे, असे वक्तव्य माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे.

reservation should be given to maratha without interfering in obc reservation said jaydatta kshirsagar
ओबीसी आरक्षणात ढवळाढवळ न करता मराठ्यांना आरक्षण द्यावे - जयदत्त क्षीरसागर

अहमदनगर - मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमची हरकत नाही. मात्र, ओबीसींचे आरक्षण कमी न करता किंवा ओबीसी आरक्षणात ढवळाढवळ न करता त्यांना आरक्षण द्यावे, असे वक्तव्य माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथे तेली समाजाच्यावतीने राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्षीरसागर बोलत होते.

जयदत्त क्षीरसागर यांची प्रतिक्रिया

ओबीसी आरक्षणात ढवळा ढवळ करू नये -

आरक्षणासाठी मराठा समाज आग्रही असताना राज्यभरात विविध आंदोलन सुरू आहेत. तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणीदेखील जोर धरू लागली आहे. यावर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ओबीसी आरक्षणात ढवळा ढवळ न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमची हरकत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच ओबीसीसाठी असलेल्या केंद्राच्या 27% आरक्षणाचे वर्गीकरण करून अती मागास वर्गात तेली समाजाला समाविष्ठ करावे, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा, तसेच संख्येच्या प्रमाणात तेली समाजाला राजकीय आरक्षण मिळावे, आशा मागणीदेखील यावेळी केली.

हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : कोल्हापुरातल्या 'ओपन फ्रीज'मुळे मिटतेय अनेकांची भूक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.