ETV Bharat / state

Punjab Explosive Case पंजाब बॉम्ब स्फोटक प्रकरणातील आरोपीला शिर्डीतून अटक, अहमदनगर पोलिसांसह आयबी, एटीएसची कामगिरी

author img

By

Published : Aug 20, 2022, 5:49 PM IST

पंजाब स्फोटक प्रकरणातील Punjab explosive case आरोपी रजेंदर कुमार उर्फ बाऊ रामकुमार वेदी तहसील पट्टीरोड जिला-तरंगतारांग याला शिर्डीतील एका लॉज मधून अटक Accused from Punjab arrested in Shirdi करण्यात आली आहे. ही कारवाई महाराष्ट्र एटीएस Action by Maharashtra ATS आयबीच्या पथकासह अहमदनगर जिल्हा पोलिसांनी यशस्वीपणे बजावली आहे.

Punjab explosive case
पंजाब स्फोटक प्रकरण

शिर्डी - पंजाब पोलीस इन्स्पेक्टरच्या वाहणाखाली बॉम्ब ठेवून फरार झालेला स्फोटक प्रकरणातील Punjab explosive case आरोपी रजेंदर कुमार उर्फ बाऊ रामकुमार वेदी तहसील पट्टीरोड जिला-तरंगतारांग याला शिर्डीतील एका लॉज मधून अटक Accused from Punjab arrested in Shirdi करण्यात आली आहे. ही कारवाई महाराष्ट्र एटीएस Action by Maharashtra ATS आयबीच्या पथकासह अहमदनगर जिल्हा पोलिसांनी यशस्वीपणे बजावली आहे. मालदीव देशात फरार होऊ पाहणाऱ्या आरोपीला शिर्डीतच अटक करून पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. यात अहमदनगर पोलिसांनी महत्वाची भूमिका निभावत पूर्णपणे गुप्तत्ता बाळगली आहे. आरोपीला पंजाब एटीएसच्या ताब्यात Accused Rajender Kumar in custody of Punjab ATS देण्यात आले आहे.

संजय सातव उपविभागीय पोलिस अधिकारी शिर्डी

शिर्डीतील एका लॉज मधून अटक पंजाब पोलिसांनी आरोपी रजेंदर कुमार याला ताब्यात घेत विशेष विमानाने आज शनिवारी थेट दिल्ली गाठले. आरोपी पकडण्याची कारवाई शुक्रवारी सुरू झाली होती. या प्रकरणात स्फोटक प्रकरणात तीन आरोपी असल्याचे पुढे येत आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पंजाब पोलिसातील रणजीत एव्हेन्यु पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात रजेंदर कुमार ऊर्फ बाऊ रामकुमार वेदी त्याचे साथीदार हरपालसिंग फत्यदिपसिंग यांनी पंजाब पोलीसात नेमणूकीस असलेले सब इन्सपेक्टर दिलबागसिंग यांचे चारचाकी गाडीखाली बॉम्ब ठेवुन फरार झाले होते. या गुन्ह्यातील रजेंदर कुमार हा मालदिव देशात विमानाने जाण्यासाठी निघाला होता. परंतु सदर आरोपीचे कोरोना चाचणी रिपोर्ट नसल्याने विमानाचे तिकीट कनफर्म झाले नाही. म्हणुन सदरचा आरोपी हा दिल्ली येथून मंगला एक्सप्रेसने नांदेड येथे जाण्यासाठी निघाला. परंतु सदरची ट्रेन नांदेडला न जाता मनमाड पर्यंत असल्याने आरोपी हा मनमाड रेल्वे स्टेशन Manmad Railway Station येथेच उतरला. तेथे आरोपीने मनमाड स्टेशन येथे एका लॉजवर एक दिवस मुक्काम केला त्यानंतर तो दुस-या दिवशी शिर्डी येथे दर्शन घेण्यासाठी आला. तो शिर्डी येथील गंगा कॉन्टीनेंटल लॉजवर Ganga Continental Lodge in Shirdi थांबला होता. याच दरम्यान ही माहिती पोलिसांना मिळाली होती.


एन.डी.पी.एस कायदयान्वये गुन्हा आरोपीची माहीती मिळाल्यानंतर पोलिसांनी शिर्डीतील गंगा कॉन्टीनेंटल हॉटेलचे रजिस्टर चेक केले असता आरोपी हा रुम नंबर ३१२ मध्ये राहत असल्याची माहीती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीची चौकशी केली असता पहिल्यांदा महाराष्ट्रात आल्याची कबूली त्यांने दिली आहे. आरोपीवर यापुर्वी एन.डी.पी.एस कायदयान्वये गुन्हा दाखल आहे.

दरम्यान, अहमदनगर पोलिसांनी केली विशेष कामगिरी सदरची कारवाईत जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपअधीक्षक संजय सातव शिर्डीचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, सपोनि प्रविण दातरे, पोलीस उपनिरीक्षक रोहीदास माळी, पोना संदीप गडाख, पोकॉ नितीन शेलार, पोकॉ नितीन सानप, पोकों फिरोज पटेल, पोकॉ अजय अंधारे व दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सचिन खैरनार, सपोनि प्रताप गिरी, पोहेकॉ संजय हराळे, पोहेकॉ रविंद्र महाले यांनी कामगिरी केली आहे.

हेही वाचा - Threat Message to Attack Mumbai हल्ल्याची धमकी देणाऱ्याने व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवला यूपी एटीएसचा नंबर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.