ETV Bharat / state

अहमदनगर : घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करणाऱ्या होटेलवर पोलिसांचा छापा

author img

By

Published : Feb 26, 2021, 11:48 AM IST

हॉटेलच्या किचनमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या टाक्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या हॉटेलवर कारवाई करत 14 घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले आहे.

police raid on hotel using domestic gas cylinders in ahmednagar
अहमदनगर : घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करणाऱ्या होटेलवर पोलिसांचा छापा

अहमदनगर - शहरातील कोठला भागातील प्रसिद्ध असलेल्या हॉटेल कुरेशी येथे हॉटेलच्या किचनमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या टाक्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या हॉटेलवर कारवाई करत 14 घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले आहे.

प्रतिक्रिया

अनधिकृतपणे सिलेंडर पुरवणारी साखळी -

या प्रकरणी पोलिसांनी हॉटेलच्या व्यवस्थापकवर गुन्हा दाखल केला आहे. शहरात एकीकडे सर्वसामान्य ग्राहकांना सिलेंडर नोंदणी केल्यानंतर अनेक दिवस सिलेंडर मिळण्यासाठी वाट पाहावी लागते. तसेच गॅस एजन्सी कर्मचाऱ्यांचे ग्राहकांशी वागणे मगृरीचे असते आणि त्यातून अनेकदा वाद होत असतात. मात्र, दुसरीकडे विशेष करून हॉटेल चालकांना याच घरगुती सिलेंडरचा पुरवठा बिनदिक्कत होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. अनेक चहा-वडापाव टपरीपासून ते मोठमोठ्या हॉटेल्समध्ये घरगुती वापराचा गॅस सिलेंडर पुरवठा अवैधरित्या होतो. या साखळीत गॅस एजन्सी किंवा त्यांचे डिलिव्हरी बॉय यांचा सहभाग हा संशयास्पद असला, तरी कारवाई होताना फक्त ती हॉटेल्सवरच होताना दिसून येते.

पोलिसांचे हॉटेल व्यावसायिकांना आवाहन -

यासंदर्भात शहर पोलिसांनी शहरातील हॉटेल चालकांना इशारा दिला आहे. घरगुती गॅस सिलिंडरचा वापर आढळल्यास हॉटेल चालकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.

हेही वाचा - ट्विटर, फेसबुकसारख्या कंपन्यासाठी नवी नियमावली, वाचा सविस्तर...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.