ETV Bharat / state

Padmashri Rahibais Yalgar : अवैध दारू व्यवसायाविरुद्ध पद्मश्री राहीबाईंचा यल्गार; महिलांनी एकत्रित केले तीव्र आंदोलन

author img

By

Published : Feb 8, 2023, 10:59 PM IST

दारू हे असे व्यसन आहे की ज्याच्या आहारी गेलेले पुरुष आपले कुटुंब, समाज, लहान मुले, महिला यांचा कुठलाही विचार करीत नाही. सामाजिक भान गमावून समाजात व कुटुंबात अस्थिरता निर्माण करतात. असेच काहीसे पद्मश्री राहीबाई पोपेरे व महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचे मूळ गाव असलेले अकोले तालुक्यातील कोंभाळणें येथे घडले आहे.

Etv BharatPadmashri Rahibai's Yalgar Against Illegal Liquor Business....
अवैध दारू व्यवसायाविरुद्ध पद्मश्री राहीबाईंचा यल्गार; महिलांनी एकत्रित केले तीव्र आंदोलन

अवैध दारू व्यवसायाविरुद्ध पद्मश्री राहीबाईंचा यल्गार; महिलांनी एकत्रित केले तीव्र आंदोलन

अहमदनर : अवैध दारू व्यवसाय जोर धरत असताना अनेक कुटुंबे देशोधडीला लागली. अनेकदा ग्रामस्थांनी विशेषत: महिलांनी एकत्र येऊन दारू व्यवसायाला जोरदार विरोध केला. त्यासाठी अनेकदा गावाने ठरावही केले. परंतु, मूठभर लोकांनी गावचे प्रयत्न हाणून खुलेआम दारू विक्री सुरू केली. गावातील तरुण व्यसनाधीन बनत होते. अनेक महिलांचे तरुणपणातच कुंकू पुसले होते.

गावची डोळ्यांसमोर होणारी दुर्दशा महिलांना पाहवेना : गावची डोळ्यांसमोर होणारी दुर्दशा महिलांच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेली. गावची होणारी अधोगती पद्मश्री राहीबाई पोपेरे आणि गावातील इतर स्त्रियांना सहन झाली नाही. हळदी-कुंकवाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या सुमारे दीडशे ते दोनशे महिलांनी अवैध दारू व्यवसायाविरुद्ध एल्गार पुकारला. हळदी कुंकवाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या महिला आपले कुंकूच व्यसनानी संपणार असेल, तर नुसते हळदी कुंकू करून काय उपयोग. त्यांच्या नावाने कुंकू लावायचे तेच व्यसनाने संपणार असतील तर अवैधपणे दारू व्यवसाय करणारे अड्डे उद्ध्वस्त केले पाहिजेत यावर सर्व महिलांचे एकमत झाले.

जोरदार घोषणाबाजी करीत दारू व्यवसाय करणाऱ्या टपऱ्यांवर हल्ला : हळदी कुंकवाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करीत दारू व्यवसाय करणाऱ्या टपऱ्यांवर जोरदार हल्ला चढवण्यात आला. सर्व महिलांना देशी दारूच्या बॉटल रस्त्यावर फेकत त्यांचा चुराडा केला. यापुढे गावात दारू विक्री करताना दिसल्यास महिला ते सहन करणार नाहीत हे निक्षून सांगितले. अनेकदा समज देऊन तसेच शासनाकडे विनंती करून गावातील अवैध दारू विक्री व्यवसाय थांबला नाही.

पद्मश्री राहीबाई पोपरे यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी : या दारू व्यावसायिकांनी उलट महिलांची खिल्ली उडवत राजरोजपणे हा व्यवसाय जोर चालू ठेवला. त्यामुळे हा व्यवसाय कमी होण्याऐवजी जोरदार चालत होता. गावात अनेक विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी, अभ्यासक, शास्त्रज्ञ गावरान बियांची बँक पाहण्यासाठी येतात. त्यांच्यासमोर दारू विक्रीचा व्यवसाय गावची इज्जत चव्हाट्यावर आणतो हे अत्यंत क्लेशदायक आहे. गावच्या प्रतिष्ठेला या व्यवसायाने तडा जात होता. सर्व प्रकारे प्रयत्न करून थकल्यानंतर शेवटचे पाऊल आज आम्ही उचलले. पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांनी सांगितले.

हेही वाचा : Eknath Shinde Birthday : मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस थेट न्यूयॉर्कमध्येही साजरा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.