ETV Bharat / state

कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ, राज्य सरकारकडूनही उच्च न्यायालयात याचिका दाखल

author img

By

Published : Jul 23, 2021, 9:01 PM IST

इंदोरीकर महाराज
इंदोरीकर महाराज

कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाल्याचे दिसत आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या कीर्तनात वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यांच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने न्यायालयात धाव घेतली होती. या खटल्यात संगमनेर न्यायालयाने इंदोरीकर महाराजांना दिलासा दिला होता. जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांनी यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. आता राज्य सरकारनेही उच्च न्यायालयात आपील दाखल केले आहे.

अहमदनगर - कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाल्याचे दिसत आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या कीर्तनात वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यांच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने न्यायालयात धाव घेतली होती. या खटल्यात संगमनेर न्यायालयाने इंदोरीकर महाराजांना दिलासा दिला होता. जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांनी यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. आता राज्य सरकारनेही उच्च न्यायालयात आपील दाखल केले आहे.

काय आहे प्रकरण?

इंदोरीकर महाराजांनी काही दिवसांपूर्वी आपल्या कीर्तनात 'सम तिथीला स्त्रीसंग झाला, तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते' असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला होता. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीने न्यायालयात धाव घेतली होती. काही दिवसांपूर्वी या प्रकरणात संगमनेर न्यायालयाने इंदोरीकर यांना दिलासा देत खटला रद्द केला होता. या आदेशाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले होते.

2 ऑगस्टला सुनावणी

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात राज्य सरकारतर्फे 22 जुलै रोजी आपील दाखल करण्यात आले आहे. त्यावर पुढील प्रक्रिया सुरू असून सुनावणीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. या प्रकरणातील सरकारतर्फे फिर्याद दिलेले संगमनेरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भास्कर भवर सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे आपील दाखल करण्यासंबंधीचा निर्णय होण्यास वेळ लागला. अखेर नवीन अधिकाऱ्यांमार्फत हे आपील दाखल झाले आहे. यातील मूळ तक्रारदार अंधश्रद्धा निमूर्लन समितीच्या रंजना गवांदे यांनी यापूर्वीच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर 2 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. सरकारतर्फे दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या सुनावणीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.

हेही वाचा - राज्यातील पूर परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, दुर्घनेतील मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.