ETV Bharat / state

कर्जत-जामखेड, पारनेर मतदारसंघात राष्ट्रवादीत बंडखोरीची शक्यता...

author img

By

Published : Sep 20, 2019, 8:27 AM IST

कर्जत-जामखेड मतदारसंघातून रोहित पवार यांनी गेल्या वर्षभरापासून कार्यक्रमांचा आणि प्रचाराचा धडाका लावलेला आहे., मात्र बाहेरून आलेल्या उमेदवारांची उमेदवारी निश्चित होत असताना येथील स्थानिक नेत्यांमध्ये मात्र चलबिचल पहायला मिळत आहे...

राष्ट्रवादीचे नाराज उमेदवार बंड करण्याची शक्यता

अहमदनगर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांची कर्जत-जामखेड मतदारसंघातून उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्याचप्रमाणे पारनेर मतदारसंघांत निलेश लंके यांची उमेदवारी राष्ट्रवादीकडून अंतिम मानली जात आहे.

हेही वाचा... जामनेर विधानसभा मतदारसंघ : भाजपचे 'संकटमोचक' मात्र विरोधकांसाठी संकट ?

रोहित पवार आणि निलेश लंके या दोन्ही इच्छुक उमेदवारांनी आपले तिकीट निश्चित मानत, गेल्या वर्षभरापासून आपल्या मतदारसंघात कार्यक्रमांचा आणि प्रचाराचा धडाका लावलेला आहे. रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आहेत. तसेच ते पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यातील उमेदवार कर्जत-जामखेड मतदारसंघात येतात, आणि त्यांची उमेदवारी अंतिम मानली जात असल्याने, कर्जत जामखेडमधील इच्छुक असलेल्या राष्ट्रवादीमधील काही स्थानिक नेते मंडळींमध्ये चलबिचल सुरू आहे.

ncp ahmednagar upsetting candidate may be possible to make revolt
राष्ट्रवादीचे नाराज उमेदवार बंड करण्याची शक्यता

हेही वाचा... बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ : मुनगंटीवार विजयाची 'हॅट्रिक' मारणार?​​​​​​​

उमेदवारी नाकारल्यास कर्जत तालुक्यात वजन असलेला गुंड परिवार भाजपकडे-

कर्जत-जामखेड मतदारसंघातून इच्छुक असलेल्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड आणि त्यांचे पती राजेंद्र गुंड यांचे नाव आघाडीवर आहे. तर त्यांना उमेदवारी मिळाली नाही तर ते भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. या जागेवर आपल्यालाच उमेदवारी मिळावी, अशी मागणी त्यांनी यापूर्वीच पक्षाच्या मुलाखती मध्ये केलेली आहे. मात्र आता रोहित पवार यांचे नाव अंतिम समजले जात असताना कर्जत तालुक्यात वजन असलेला गुंड परिवार भाजपकडे वाटचाल करत असल्याची जोरदार चर्चा आहे.

हेही वाचा... नेवासा विधानसभा मतदारसंघ : तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी?​​​​​​​

नाराज उमेदवार बंड करण्याची शक्यता

कर्जत-जामखेड प्रमाणेच पारनेर मतदारसंघामध्ये शिवसेनेमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले निलेश लंके यांची उमेदवारी ही अंतिम मानली जात आहे. मात्र या ठिकाणाहून 2014 ला राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवलेले आणि यंदाही उमेदवारीसाठी इच्छुक असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनीही आपल्यालाच उमेदवारी मिळावी असा आग्रह धरला आहे. जर उमेदवारी मिळाली नाही तर आपल्याला सर्व पर्याय उपलब्ध असल्याचे, त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांचा कल हा भाजपकडे असल्याचे बोलले जाते.

हेही वाचा... श्रीरामपूर विधानसभा: युतीकडून तिकीटासाठी रस्सीखेच, भाऊसाहेब कांबळेंच्या शिवसेना प्रवेशाने उत्सुकता​​​​​​​

यामुळे एकूणच आतापर्यंत राष्ट्रवादी पक्षासोबत अनेक वर्ष एकनिष्ठ असलेल्यांनी उमेदवारी मिळाल्यास बंडाची हाक दिल्याने, कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवार यांना तर पारनेर मतदारसंघात निलेश लंके यांना या संभाव्य पक्षांतराचा आणि बंडाचा फटका बसू शकतो. या पार्श्वभूमीवर कर्जत जामखेड मतदारसंघातून गुंड परिवाराची समजूत काढण्याचे काम पवार कुटुंबीयांकडून सुरू आहे., तरीही अजित पवार यांचे खंदे समर्थक असलेला गुंड परिवार नेमकी काय भूमिका घेतात याची उलटसुलट चर्चा मतदारसंघात सुरू आहे. रोहित यांच्या अनेक कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहिले आहेत. मात्र अजित पवार यांची अनुपस्थिती हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे.

Intro:अहमदनगर- कर्जत आणि पारनेर मतदारसंघात राष्ट्रवादीत नाराजी..
Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_ncp_dissatisfy_image_7204297

अहमदनगर- कर्जत आणि पारनेर मतदारसंघात राष्ट्रवादीत नाराजी..

अहमदनगर- जिल्ह्यामध्ये कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित पवार यांची तर पारनेर मतदारसंघांमध्ये निलेश लंके यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस कडून अंतिम समजले जात आहे. या संभाव्य उमेदवारीच्या आधारावर दोन्ही उमेदवारांनी गेल्या वर्षभरापासून आपल्या मतदारसंघात कार्यक्रमांचा आणि प्रचाराचा धडाका लावलेला आहे. रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आहेत. ते पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यातील उमेदवार कर्जत-जामखेड मतदारसंघात येत असताना आणि त्यांची उमेदवारी अंतिम मानली जात असताना सहाजिकच कर्जत जामखेड मध्ये इच्छुक असलेल्या राष्ट्रवादी मधील काही मंडळींमध्ये चलबिचल सुरू असून यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड आणि त्यांचे पती राजेंद्र गुंड हे भाजपच्या वाटेवर असल्याचं आता समोर येत आहे. या जागेवर आपल्याला उमेदवारी मिळावी अशी मागणी त्यांनी यापूर्वीच पक्षाच्या मुलाखती मधे केली आहे. मात्र आता रोहित यांचे नाव अंतिम समजले जात असताना कर्जत तालुक्यात वजन असलेला गुंड परिवार भाजप कडे वाटचाल करत असल्याची जोरदार चर्चा आहे. त्याचबरोबर पारनेर मतदारसंघामध्ये शिवसेने मधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले निलेश लंके यांची उमेदवारी ही अंतिम मानली जात असताना या ठिकाणाहून 2014 ला राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवलेले आणि यंदाही उमेदवारीसाठी इच्छुक असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनीही उमेदवारी मिळणार नसेल तर आपल्याला सर्व पर्याय उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांचाही कल भाजप कडे असल्याचे बोलले जातेय. एकूणच आतापर्यत राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ असलेल्याना उमेदवारी मिळणार नसेल तर एकूणच कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवार यांना तर पारनेर मतदारसंघात निलेश लंके यांना ह्या संभाव्य पक्षांतराचा फटका बसू शकतो. या पार्श्वभूमीवर कर्जत जामखेड मतदारसंघातून गुंड परिवाराची समजूत काढण्याचे काम पवार कुटुंबियांकडून सुरू असले तरी अजित पवार यांचे खंदे समर्थक असलेला गुंड परिवार नेमकी काय भूमिका घेतात आणि कोणाच्या आदेशाने घेतात याचीही उलटसुलट चर्चा मतदारसंघात सुरू आहे. रोहित यांच्या अनेक कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहिले असले तरी अजित पवार यांची अनुपस्थिती आता चर्चेचा विषय ठरत आहे.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- कर्जत आणि पारनेर मतदारसंघात राष्ट्रवादीत नाराजी..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.