ETV Bharat / state

Navratri २०२३ : एकाच ठिकाणी साडेतीन शक्तीपीठांचं दर्शन; राज्यातील एकमेव मंदिर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 18, 2023, 10:23 PM IST

Shaktipeeth In Maharashtra
साडेतीन शक्तीपीठांचं दर्शन

Navratri 2023 : नवरात्र उत्सवात भक्तीचा जागर सुरू झाला आहे. राज्यातील साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठी गर्दी करत आहेत. मात्र, तुम्हाला तुळजापूरची भवानी, माहूरची रेणूका देवी, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि वणीच्या सप्तश्रृंगी मातेचे दर्शन एकाच ठिकाणी करता येणं शक्य आहे.

साडेतीन शक्तीपिठांच एकदाच ठिकाणी मिळणार दर्शन

अहमदनगर (शिर्डी) : Navratri 2023 : नवरात्रोत्सव म्हणजे नऊ रात्री आणि नऊ दिवसाचं महत्वाचं व्रत होय. तुळजापूरची भवानी, (Tulaja Bhavani) माहूरची रेणुका, (Renukadevi) वणीची सप्तशृंगी (Saptashrungi Devi) आणि कोल्हापूरची अंबाबाई या (Kolhapur Mahalaxmi) साडेतीन शक्तीपीठांमध्ये (Sadetin Shakti Peeth) नवरात्र उत्सवात भाविकांनी एकच गर्दी केलीय. अशा या गर्दीत भाविकांना तासंतास दर्शनासाठी ताटकळावं लागतंय. या सर्व शक्तीपीठांचं जर तुम्हाला एकाच ठिकाणी दर्शन मिळालं तर कसं वाटेल? आणि हे खरं शक्य आहे. शिर्डी-शनिशिंगणापूरची वारी करताना ते साध्य होतं. या दोन तिर्थस्थळांच्या मार्गावरच कोल्हार भगवतीपूर यथे (kolhar Bhagwatipur) भगवती माताचं मंदिर आहे. जेथे या सर्व आदीशक्ती एकवटल्या आहेत.

अशी आहे आख्यायिका : अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार भगवतीपूर (Bhagwati Mandir Kolhar) येथे भगवतीमातेचं तीन शक्तीपीठ एकत्रित असलेलं स्थान आहे. हे महाराष्ट्रातील एकमेव स्थान आहे. या ठिकाणी भगवतीमातेचं दर्शन घेण्यासाठी नवरात्र उत्सवात देवी भक्तांची रीघ लागते. आज भगवतीमातेचं हे मंदिर लाखो भाविकांचं श्रद्धा स्थान म्हणून ओळखलं जातं. पूर्वी मंदिर हेमाडपंथी होतं, परंतु काही वर्षापूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलाय आणि त्याला नवीन स्वरूप मिळालंय. नवरात्र उत्सव काळात मोठ्या प्रमाणात महिला मंदिरातच घट बसवतात आणि नऊ दिवस मंदिर हेच त्यांचं सर्वस्व असतं. नवसाला पावणारी म्हणून देवीभक्त आपला नवस फेडण्यासाठी घट बसवतात, अशी यामागची मान्यता आहे.

असा दिला दृष्टांत : या मंदिराच्या प्रवेश द्वाराजवळ लोटांगण बाबांची मूर्ती नजरेस पडते. लोटांगणबाबा निस्सीम देवीभक्त होते. बाबा नवरात्र काळात देवी दर्शनासाठी साडेतीन शक्तीपीठांची वारी करत असतं. मात्र, त्यांना उतार वयात वारी करण शक्य झालं नाही. त्यामुळे ते अत्यंत व्यतिथ झाले, त्यावेळेस देवीने सर्व शक्तीपिठांच दर्शन येथेच घडेल, असा दृष्टांत दिला, अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे देवीच दर्शन घेणारा प्रत्येक भक्त लोटांगण बाबांचंही आवश्य दर्शन घेतो. येथे विराजमान झालेल्या चारही मूर्तीची स्थापना कधी झाली याची मात्र वेगळीवेगळी उदाहरणे सांगितली जातात.

मंदिरावर केली विद्युत रोषणाई : नवरात्र उत्सव काळात कोल्हार आणि भगवती या दोन गावात कोणतंही मंडळ देवाची प्रतिष्ठापणा करत नाहीत. एकत्रित हा उत्सव मंदिरातच साजरा केला जातो. उत्सवात धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असते. तर मंदिराला आकर्षक फुलांनी सजवण्यात आलंय. तसेच मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आलीय.

हेही वाचा -

  1. Navratri २०२३ : आई अंबाबाईला तिरुपती देवस्थानकडून मानाचा शालू अर्पण; पाहा व्हिडिओ
  2. Navratri 2023 : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ सप्तशृंगीदेवी मंदिराच्या गाभाऱ्यास 465 किलो चांदीचा नवा साज, पहा व्हिडिओ
  3. Navratri २०२३ : नवरात्रीत चप्पल न घालण्याचं काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.