ETV Bharat / state

कर्जतमध्ये वृक्षारोपणाने नवीन वर्षाचे स्वागत; आमदार रोहित पवारही सहभागी

author img

By

Published : Jan 2, 2021, 5:18 PM IST

कर्जत येथे गेल्या तीन महिन्यांपासून श्रमदानातून स्वच्छतेच्या स्वच्छ व सुंदर कर्जत अभियानात 'माझी वसुंधरा' या स्पर्धेअंतर्गत विविध सामाजिक संघटना, व्यावसायिक, विद्यार्थी यांच्या सहभागाने कर्जत शहरात स्वछता अभियान राबविण्यात येत आहे. यावेळी आमदार रोहित पवार यांनी सहभागी होऊन वृक्षारोपण करत एक तास सर्वांबरोबर श्रमदान केले.

अहमदनगर आमदार रोहित पवार न्यूज
अहमदनगर आमदार रोहित पवार न्यूज

अहमदनगर - कर्जत शहरात 'माझी वसुंधरा' अभियानात नवीन वर्षांची सुरुवात विविध श्रमप्रेमींनी वृक्षारोपण करून केली. यावेळी आमदार रोहित पवार यांनी सहभागी होऊन वृक्षारोपण करत एक तास सर्वांबरोबर श्रमदान केले.

तीन महिन्यांपासून सुरू आहे श्रमदानातून स्वछता

कर्जत येथे गेल्या तीन महिन्यांपासून श्रमदानातून स्वच्छतेच्या स्वच्छ व सुंदर कर्जत अभियानात 'माझी वसुंधरा' या स्पर्धेअंतर्गत विविध सामाजिक संघटना, व्यावसायिक, विद्यार्थी यांच्या सहभागाने कर्जत शहरात स्वछता अभियान राबविण्यात येत आहे. नवीन वर्षाची सुरवात येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात वृषारोपण करून करण्यात आली. नवीन वर्षाची सुरुवात स्वच्छतेबरोबरच श्रमदानाने करण्यात आली. यावेळी आ.रोहित पवार यांनीही सर्व श्रमप्रेमी बरोबर सहभागी होत श्रमदान करत वृक्षारोपण केले.

कर्जतमध्ये वृक्षारोपणाने नवीन वर्षाचे स्वागत; आमदार रोहित पवारही सहभागी

हेही वाचा - लसीकरणानंतर सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे बंधनकारक आहे का?, आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती


सर्वांनी घेतली वृक्ष संवर्धनासाठी शपथ

सकाळी साडेसहा ते साडेसात दररोज नियमित सुरू असलेल्या श्रमदानातून गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील मान्यवरांनी एकत्र येत श्रमदान करून शहर स्वच्छ करण्याचा अत्यंत यशस्वी प्रयत्न केला आहे. या सातत्यपूर्ण कामाचे अनेकांनी कौतुकही केले आहे.

2020 ला गुडबाय करताना व 2021 चे स्वागत करताना या सर्व श्रमप्रेमींनी कर्जत शहरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. यासाठी कृषी उत्पन्न बाजार बाजार समिती, उपजिल्हा रुग्णालय, मुस्लीम दफनभूमी, इतर अनेक स्मशानभूमी, शासकीय कार्यालये आदी बंदिस्त ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार असून नगर पंचायत यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. या अभियानात सर्व स्तरातील नागरिक सहभागी असून सर्व राजकीय पक्षाचे लोक ही सहभागी होत आहेत. यावेळी एनएसएस च्या मुलीही सहभागी झाल्या होत्या. शेवटी सर्वानी वृक्ष संवर्धना ची शपथ घेतली.

हेही वाचा - नाशिक : नांदगावच्या जंगल परिसरात वणवा पेटला, वन्य पशु-पक्ष्यांची हानी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.