ETV Bharat / state

'भाजपचे काम फक्त विरोधासाठी; महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे काम करणार'

author img

By

Published : Jul 31, 2020, 5:07 PM IST

अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयात रेमडिसीव्हीर औषधांचे 50 किट आणि सॅनिटर कॅन यांचे हस्तांतर आमदार रोहित पवार यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामार्फत हे औषध राज्यात अनेक जिल्ह्यात देण्यात येत आहेत. यावेळी बोलताना आमदार रोहित पवार यांनी भाजप नेत्यांवर टीका केली आहे.

mla rohit pawar
आमदार रोहित पवार

अहमदनगर - सरकार आठ दिवसांत जाणार, दोन महिन्यात जाणार असे वारंवार सांगणाऱ्या विरोधीपक्ष भाजपाला पाच वर्षे असेच म्हणावे लागणार आहे. कारण महाविकास आघाडीत कुठलेही मतभेद नाहीत, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. तसेच केंद्राकडून तुटपुंजी मदत मिळत असताना सीएसआर फंडाची मदत राज्यातील विरोधी पक्ष 75 हजार कोटी रुपये सांगत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. आमचे लक्ष कोरोना नियंत्रण आणि राज्याची आर्थिक घडी बसवणे यावर असून, भाजप या परिस्थितीत फक्त शब्दांचे राजकारण करत असल्याचे आमदार रोहित पवार म्हणाले.

आमदार रोहित पवार

अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयात रेमडिसीवर औषधांचे 50 किट आणि सॅनिटर कॅन यांचे हस्तांतर आमदार रोहित पवार यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामार्फत हे औषध राज्यात अनेक जिल्ह्यात देण्यात येत आहे. यावेळी बोलताना आमदार रोहित पवार यांनी भाजप नेत्यांवर टीका केली आहे.

भाजपला सत्तेची घाई

सरकारवर टीका करणे हे विरोधी पक्षांचे काम असते. राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले आहे. मात्र, सध्या कोरोनाच्या संकटकाळात शरद पवार यांनी मांडलेली भूमिका लक्षात न घेता केवळ शब्दांचे राजकारण करण्याची सवय लागलेली भाजप पवार साहेबांची भूमिका चुकीच्या पद्धतीने मांडत आहे. आम्ही सर्व जाती, धर्म, पंथ यांना सोबत घेऊन पुढे जात आहोत. मात्र, राज्यातील अनेक भाजप नेत्यांना सत्तेची घाई झाली असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. दोन महिन्यात येणार, आठ महिन्यात येणार असे म्हणत म्हणत पाच वर्षे भाजपची निघून जाणार आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार मजबूत आहे, असा निर्वाळा आमदार रोहित पवार यांनी यावेळी दिला.

लॉकडाऊन हा उपाय नाही

खासदार सुजय विखे हे नगर शहरात लॉकडाऊनबाबत आग्रही आहेत. मात्र, लॉकडाऊन हा कोरोना नियंत्रणावर उपाय नाही. काही दिवसांचा लॉकडाऊन उठवला की लोक बाहेर पडणारच आहेत. अर्थचक्र चालणे गरजेचे आहे. तसेच आरोग्य यंत्रणा यावर अधिकाअधिक काम करत आहे. त्यामुळे अर्थकारण आणि कोरोना नियंत्रण याचा समन्वय साधणे गरजेचे आहे, असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त करत खासदार विखे यांचा मुद्दा खोडून काढला.

जनतेसाठी मी करणारच

आमदार रोहित पवार यांनी आपल्या कर्जत जामखेड मतदारसंघात दौरे, विकास कामांचे उद्घाटन, गावोगावी गाठीभेटी यांचा धडाका लावला आहे. माध्यम आणि सोशल मीडियातून याची प्रसिद्धीही सुरू आहे, यावर खासदार सुजय विखे यांनी टीका केली होती. यावर विचारले असता, आमदार रोहित यांनी जनतेला गरज असेल तर लोकप्रतिनिधी या नात्याने मी जाणारच आहे. अर्थात आम्ही सगळे नियम पाळून कार्यक्रम घेत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केलं. कुणाला आक्षेप घ्यायचा असेल तर घेऊ द्या असा उपरोधिक टोलाही त्यांनी खासदार विखे यांना नाव न घेता लगावला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.