ETV Bharat / state

'पाणीदार गावासाठी वॉटरकप स्पर्धेत सहभागी व्हा'

author img

By

Published : Feb 12, 2020, 9:44 PM IST

जामखेडमध्ये जलसंधारण वॉटर कप स्पर्धा आणि सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार रोहित पवार यांनी मतदार संघातील सरपंचांशी संवाद साधला. वॉटर कप स्पर्धेत जास्तात-जास्त गावांनी सहभाग घ्यावा असे, आवाहन पवार यांनी केले.

MLA Rohit Pawar
आमदार रोहित पवार

अहमदनगर - जलसंधारणाच्या माध्यमातून गाव पाणीदार होण्यासाठी कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघात वॉटर कप स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत प्रत्येक गावाने सहभाग नोंदवून जलसंधारण चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले.

जामखेडमध्ये सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आले

जामखेडमध्ये जलसंधारण वॉटर कप स्पर्धा आणि सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार रोहित पवार यांनी मतदार संघातील सरपंचांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील सर्वात दुष्काळी तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मान तालुक्याचे उदाहरण पवार यांनी नागरिकांना दिले. तेथील लोकांनी जलसंधारणाची चळवळ हातात घेतली म्हणून १०० कोटी पेक्षा जास्त निधी गोळा झाला. त्यातून जलसंधारणाची कामे पूर्ण केली. अशीच चळवळ जामखेड तालुक्यात उभी करणे गरजेचे आहे. यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

हेही वाचा - बेटी पढाओ'चे बॅनर लावून स्त्री सुरक्षित आहे का?, अण्णांचा सवाल

उजनीच्या माध्यमातून जामखेडचा पाणी प्रश्न मिटवणार -

लोकप्रतिनिधी म्हणून जास्तीत-जास्त लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांचा पीक विमा, शेतीचे अडकलेले प्रश्न, शिक्षण, महिलांचे प्रश्न, मुलींचे संरक्षण, असे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करणार आहे. जामखेड शहराला उजनी धरणातून पाणीपुरवठा होण्यासाठी यापूर्वी तत्वत: मान्यता मिळाली आहे. आता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर बैठक घेऊन प्रशासकीय मान्यता मिळवली आहे. लवकरच यासाठी निधी मिळवून ही योजना कार्यान्वित होईल, असेही पवार म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.