ETV Bharat / state

'सरकार स्थापन करून 60 दिवस झाले मात्र, जनहिताचा एकही निर्णय नाही'

author img

By

Published : Jan 30, 2020, 3:12 AM IST

Updated : Jan 30, 2020, 6:01 AM IST

तीन पक्षात कधी मंत्रीपदावरून तर, कधी मंत्रालयातील केबीनवरून विसंवादाचे चित्र सातत्याने पाहायला मिळत असून केवळ सत्तेसाठी हिंदूह्दयसम्राट हा शब्द बाजूला ठेवून वंदनीय हा शब्द वापरण्याची वेळ शिवसेनेवर आल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिर्डीत केली आहे.

pravin darekar
प्रविण दरेकर

अहमदनगर - राज्यात वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्रित येत सरकार स्थापन करून 60 दिवसांचा कालावधी लोटला. तरी, जनतेच्या हिताचे एकही काम होवू शकले नाही. तीन पक्षात कधी मंत्रीपदावरून तर, कधी मंत्रालयातील केबीनवरून विसंवादाचे चित्र सातत्याने पाहायला मिळत असून केवळ सत्तेसाठी हिंदूह्दयसम्राट हा शब्द बाजूला ठेवून वंदनीय हा शब्द वापरण्याची वेळ शिवसेनेवर आल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिर्डीत केली आहे.

प्रविण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधानपरिषद

हेही वाचा - नागरिकत्व कायदा लागू करणार नसल्याचे गृहमंत्र्यांचे संकेत

विधानपरिषदेचे विरोदी पक्षनेते झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रविण दरेकर यांनी बुधवारी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. साईदर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना दरेकर म्हणाले की, राज्यात विविध विचारधारेचे तीन पक्ष फक्त भाजपवर रांग व्यक्त करण्यासाठी आपली विचारधारा बाजूला ठेवत एकत्र आलेत. तरीही विविध विचारधारेचे सरकार फ़ार काळ टिकणारे नसते. शिवसेना कट्टर हिंदुत्ववादी असून समस्त राज्यातील शिवसैनिक आणी त्यांच्यावर प्रेम करणाऱयांनी बाळासाहेब ठाकरे यांना हिंदूह्दयसम्राट ही पदवी बहाल केली होती. दुदैवाने केवळ सत्तेसाठी शिवसेनेच्या नेत्यांनी हिंदुह्दयसम्राटऐवजी वंदनीय शब्द बाळासाहेबांच्या नावापुढे लावावा लागत आहे. एकप्रकारे आपल्या विचारसरनीलाच तिलांजली शिवसेनेने दिली असल्याचे दरेकर म्हणाले.

राज्यात सत्तेवर आलेल्या ठाकरे सरकारने निवडणुकीत दिलेल्या कोणत्याही आश्वासनांची पुर्तता केली नाही. शेतकऱयांना कर्जमाफी जाहीर झाली. मात्र, नियम अटीमध्येच ही कर्जमाफी अडकली आहे. या कर्जमाफीचा कोणताही लाभ शेतकऱयांना होत नाही. राज्यातील अनेक इतर विषयांकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळच नाही. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे एवढेच काम सध्या सुरू असल्याची घणाघाती टीका प्रविण दरेकर यांनी केली. तसेच निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री ठाकरेंना शेतकऱयांचा सातबारा कोरा करण्यासंबधी आणि अवकाळीग्रस्त शेतकऱयांना हेक्टरी २५ हज़ार रुपये मदत तत्काळ देण्याबाबत केलेल्या घोषणेचा विसर पडला असल्याचाही आरोप दरेकर यांनी केला आहे.

साईबाबा हे जगाचे दैवत आणि श्रद्धास्थान आहे. त्यांच्या जन्मस्थानाबाबत वाद उपस्थित करणे योग्य नाही. साईबाबांच्या मंदिराचा विकास करा, विकासाला कोणाचाही विरोध नाही. मुख्यमंत्र्यांनी जन्मस्थळाच्या केलेल्या उल्लेखावरून वाद निर्माण झाला. परंतु, मुख्यमंत्र्यांनी जबाबदारीने या प्रश्नावर दखल घेवून या वादावर पडदा टाकला आणि शिर्डीप्रती असलेली आपली सद्भावना व्यक्त केली. त्याबद्दल दरेकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Intro:





ANCHOR_राज्यात वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्रीत येवून सरकार स्थापन करून आज 60 दिवसांचा कालावधी लोटला तरी जनतेच्या हीताचे एकही काम होवू शकले नाही तीन पक्षात कधी मंत्रीपदावरून तर कधी मंत्रालयातील केबीनवरून विसंवादाचे चित्र सातत्याने पाहायला मिळत असुन केवळ सत्तेसाठी हिंदूऋदयसम्राट हा शब्द बाजूला ठेवून वंदनीय हा शब्द वापरण्याची वेळ शिवसेनेवर आली असल्याची टीका राज्य विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिर्डीत केली आहे....

VO_ विधान परिषद विरोधी पक्षनेते झाल्या नंतर पहिल्यांदा प्रविन दरेकर यांनी बुधवारी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे...साईदर्शना नंतर पत्रकारांशी बोलताना दरेकर म्हणाले की राज्यात विविध विचार धारेचे तीन पक्ष फक्त बीजेपीवर रांग व्यक्त करण्यासाठी आपली विचारधारा बाजूला ठेवत एकत्र आले असले तरी विविध विचार धारेचे सरकार फ़ार काळ टिकणारे नसते शिवसेना कट्टर हिन्दुत्ववादी असुन समस्त राज्यातील शिवसैनिक आणी त्यांच्यावर प्रेम करणा-यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदूऋदयसम्राट ही पदवी बहाल केली होती दुदैवाने केवळ सत्तेसाठी शिवसेनेच्या नेत्यांनी हिंदुऋदय सम्राट ऐवजी वंदनीय शब्द बाळासाहेबांच्या नावापुढे लावावा लागत आहे..एकप्रकारे आपल्या विचारसरनीलाच तिलांजलि शिवसेनेने दिली आहे....

VO_ राज्यात सत्तेवर आलेल्या ठाकरे सरकारने निवडनुकीत दिलेले कोणतेही आश्वासनांची पुर्तता केली नाही.शेतक-यांना कर्जमाफी जाहीर झाली मात्र नियम अटीमध्येच ही कर्जमाफी अडकली आहे या कर्जमाफीचा कोणताही लाभ शेतक-यांना होत नाही राज्यात अनेक प्रश्न असताना या प्रश्नांकित लक्ष द्यायला सरकारकडे वेळीच नाही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे एव्हडेच काम सध्या सुरू असल्याची घणाघाती टिका प्रविन दरेकर यांनी केली असून निवडनुकीपुर्वी मुख्यमंत्री ठाकरेंना शेतक-यांचा सातबारा कोरा करण्यासंबधी आणि अवकाळीग्रस्त शेतक-यांना हेक्टर २५ हज़ार रूपये मदत तत्काळ देण्यात केलेल्या घोषणेचा विसर पडला असल्याचाही आरोप दरेकर यांनी केला आहे....


VO_साईबाबा हे जगाचे देवत आणि श्रध्दास्थान आहे त्यांच्या जन्मस्थानाबाबत वाद उपस्थीत करणे योग्य नाही साईबाबांच्या मंदीराचा विकास करा विकासाला कोणाचाही विरोध नाही.. मुख्यमंत्र्यांनी जन्मस्थळाच्या केलेल्या उल्लेखावरून वाद निर्माण झाला परंतू मुख्यमंत्र्यांनी जबाबदारीने या प्रश्नावर दखल घेवून या वादावर पडदा टाकला आणी शिर्डीप्रती असलेली आपली सद्भावना व्यक्त केली त्याबद्दल दरेकर यांनी समाधान व्यक्त केले आहे....Body:mh_ahm_shirdi_pravin drekar_30_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_pravin drekar_30_visuals_bite_mh10010
Last Updated : Jan 30, 2020, 6:01 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.