ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान, ५ दिवसात ३ शेतकऱ्यांची आत्महत्या

author img

By

Published : Nov 2, 2019, 3:53 PM IST

जिल्ह्यातील राहुरी येथील २४ वर्षीय तरुण व राहता तालुक्यातील गोगलगाव येथील तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. नापिकीला कंटाळून या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समजले आहे.

मृत शेतकऱ्यांची छायाचित्रे

अहमदनगर - जिल्ह्यातील राहुरी येथील २४ वर्षीय तरुण व राहता तालुक्यातील गोगलगाव येथील तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. नापिकीला कंटाळून या दोन्ही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांच्या मृत्यूमुळे दोन्ही गावातील लोकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया देताना मृत भारत बारकू गडदे यांचे नातेवाईक

राहुरी येथील भारत बारकू गडदे (वय २४) तर राहता तालुक्यातील गोगलगाव येथील रविद्र लक्ष्मण मगर (वय ३०), असे मृत शेतकऱ्यांची नावे आहेत. अवकाळी पावसामुळे राहुरी येथील भारत गडदे यांची संपूर्ण शेती पाण्याखाली गेली. शेतातील कांदे, कपाशी, या पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यातच एल अँड टी या फायनान्स कंपनीचे कर्जाचे हफ्ते त्यांच्यावर थकीत असल्याने त्यांच्या ट्रक्टरचा लिलाव करण्यात आला. ट्रक्टरचा लिलाव केल्याने भारत गडदे यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती त्यांच्या नेतवाईकांनी दिली आहे.

गोलगाव येथील रविंद्र मगर हे देखील अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीमुळे वैफल्यग्रस्त होते. वडिलांच्या मृत्यूनंतर ते आपल्या वृद्ध आईसोबत राहत होते. रविद्र यांना एक भाऊ आहे. दोघा भावात मिळून रविंद्र यांना गोगलगाव येथे अवघी तीन एकर शेतजमीन आहे. वेळेत पाऊस न झाल्याने त्यांच्या शेत जमिनीत पेरलेले व्यवस्थित उगवले नाही. जे उगवले ते सध्याच्या अतिवृष्टीमुळे पदरी पडले नाही. यामुळे रविंद्र निराश झाले होते. त्यातच दिवाळी सणाकरता कुटुंबासाठी आणि बहीण, भाच्यांना काहीच घेण्याची ऐपत नसल्याने ते तणावात होते. यातूनच गुरूवारी मध्यरात्री वृद्ध आई घरात झोपल्यानंतर रविंद्ररने घराच्या छताला दोरी बांधून गळफास घेवून जीवनयात्रा संपविली.

हेही वाचा- रोहित पवारांची जामखेडमध्ये भव्य मिरवणूक; 28 जेसीबींवरून उधळला गुलाल

Intro:



Shirdi_Ravindra Mahale


ANCHOR_ अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील 24 वर्षीय तरुण शेतक-यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं मोठी खळबळ उडालीय..भारत बारकु गडदे असं मृतू शेतकार्याचे नाव आहे....

VO_ सध्या जिल्ह्यात अवकाळी पावसानं शेतीच मोठ नुकसान झाल आहे..या परतीच्या पाऊसाने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेय भारत बारकु गडदे यांची संपुर्ण शेती पाण्याखाली गेल्याने,कांदे,कपाशी या पिंकाचं मोठ नुकसान झाल्याने त्यांचावर L&T फायन्स कंपनीना कर्जाचे हफ्ते थकले म्हणून टॅक्टर चा निलाव केल्याने त्यांन टोकाच पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिलीय....

BITE_ बापुंसाहेब गडदे , नातेवाईक (पांढरा शर्ट)

BITE_विजय तमनर, नातेवाईक (निळसर शर्ट )



Body:mh_ahm_shirdi_farmer Suicide_2_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_farmer Suicide_2_visuals_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.