ETV Bharat / state

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तीन दिवशीय छायाचित्र प्रदर्शनास भरघोस प्रतिसाद

author img

By

Published : Jul 28, 2022, 4:42 PM IST

huge response to three day photo exhibition on amrit mahotsav of indian independence in shirdi
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तीन दिवशीय छायाचित्र प्रदर्शनास भरघोस प्रतिसाद

या पुस्तक प्रदर्शनात भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील यशोगाथा, कला, संस्कृती, वारसा, विज्ञान व क्रीडा आदि विविध विषयांची मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील पुस्तके सवलतीच्या दरात विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. तसेच या ठिकाणी शाहीर हमीद सय्यद व कलाकारांचे देशभक्तीपर गीते व पोवाड्याचा सांस्कृतिक कार्यक्रम ही ठेवण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वाक्षरी अभियान ही राबविण्यात येत आहे. 'तिरंगा सेल्फी बुथ' हा या प्रदर्शनास भेट देणाऱ्या साईभक्‍त व नागरिकांचे आकर्षण ठरत आहे.

शिर्डी (अहमदनगर) - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (आझादी का अमृत महोत्सव) हनुमान मंदिराशेजारील १६ गुंठे जागेतील श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडपात दिनांक २६ जुलै ते २८ जुलै २०२२ या कालावधीत भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील ठळक घटनांना उजाळा देणाऱ्या तीन दिवशीय छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उदघाटन श्री साईबाबा संस्थानच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या हस्ते करण्यात आले होते. या तीन दिवसीय प्रदर्शनाला नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला.


महान स्वातंत्र्यसेनानी यांची जीवनगाथा - या प्रदर्शनात भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील विविध महत्त्वाच्या घटना-घडामोडी, चित्र स्वरूपात प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. यात १८५७ ते १९४७ भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान स्वातंत्र्यसेनानी यांची जीवनगाथा चित्र आणि माहिती स्वरुपात मांडण्यात आली आहे. प्रदर्शनाच्या ठिकाणी माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या, प्रकाशन विभागातर्फे पुस्तक प्रदर्शन विक्री स्टॉल ठेवण्यात येणार आहे. या पुस्तक प्रदर्शनात भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील यशोगाथा, कला, संस्कृती, वारसा, विज्ञान व क्रीडा आदि विविध विषयांची मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील पुस्तके सवलतीच्या दरात विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. तसेच या ठिकाणी शाहीर हमीद सय्यद व कलाकारांचे देशभक्तीपर गीते व पोवाड्याचा सांस्कृतिक कार्यक्रम ही ठेवण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वाक्षरी अभियान ही राबविण्यात येत आहे. 'तिरंगा सेल्फी बुथ' हा या प्रदर्शनास भेट देणाऱ्या साईभक्‍त व नागरिकांचे आकर्षण ठरत आहे.

या प्रतिष्ठित नागरिकांनी दिली भेट - माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अहमदनगर येथील केंद्रीय संचार ब्यूरो व श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्‍या या छायाचित्र प्रदर्शनाच्‍या उदघाटन कार्यक्रम प्रसंगी पुणे केंद्रीय संचार ब्युरोचे उपसंचालक निखिल देशमुख, मुंबई प्रकाशन विभाग सहायक संचालक उमेश उजगरे, शिर्डी नगरपरिषदचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, अहमदनगर केंद्रीय संचार ब्यूरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, सहायक क्षेत्री प्रचार अधिकारी श्री.पी.कुमार, क्षेत्रीय प्रचार सहायक देवेंद्र हिरनाईक, माहिती अधिकारी सुरेश पाटील आणि सुर्यतेजचे संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके, श्री साईबाबा संस्थानचे प्रशासकीय अधिकारी दिलीप उगले, सर्व विभागांचे विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते. या प्रदर्शनास श्री साईबाबा संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव, राहाता तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी भेटी दिल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.