ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात

author img

By

Published : Jan 16, 2021, 6:59 PM IST

केंद्र आणि राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आज लसीकरणाची मोहिम राबविण्यात आली. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात एकूण १२ केंद्रांवर ही मोहिम राबविण्यात आली. यात जिल्हा सामान्य रुग्णालयासह जिल्ह्यातील आठ ग्रामीण रुग्णालये आणि महानगरपालिका क्षेत्रातील ४ नागरी आरोग्य केंद्रांचा समावेश आहे.

first phase of corona vaccination begins in ahmednagar
अहमदनगरमध्ये कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात

अहमदनगर - देशभरात आज कोरोना लसीकरणाल सुरुवात झाली आहे. महानगरपालिका आरोग्य केंद्र तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात कोविड लसीकरणाचा शुभारंभ जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते करण्यात आला होता.

अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

जिल्ह्यात बारा केंद्रावर लसीकरण -

केंद्र आणि राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आज लसीकरणाची मोहिम राबविण्यात आली. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात एकूण १२ केंद्रांवर ही मोहिम राबविण्यात आली. यात जिल्हा सामान्य रुग्णालयासह जिल्ह्यातील आठ ग्रामीण रुग्णालये आणि महानगरपालिका क्षेत्रातील ४ नागरी आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. प्रत्येक केंद्रावर 100 लाभार्थ्यांना ही लस दिली जाणार आहे. संरक्षण विभागाकरिताही 310 डोसेस देण्यात आले आहेत. कोरोना काळात आरोग्य यंत्रणेने बजावलेली भूमिका महत्त्वपूर्ण असून पहिल्या टप्प्यात त्यांना लस देण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिली.

अंगणवाडी सेविकेला लसीचा पहिला मान -

जिजामाता नागरी आरोग्य केंद्र येथे ज्योती लवांडे या अंगणवाडी सेविकेला पहिला डोस देण्यात आला, तर जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी लसीचा पहिला डोस घेतला. त्यानंतर जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली.

ही आहेत जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे -

आज जिल्हा सामान्य रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी, उपजिल्हा रुग्णालय कर्जत, शेवगाव ग्रामीण रुग्णालय, श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालय, राहाता ग्रामीण रुग्णालय, संगमनेर ग्रामीण रुग्णालय, अकोले ग्रामीण रुग्णालय येथे लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. याचबरोबर, महानगरपालिका क्षेत्रातील तोफखाना नागरी आरोग्य केंद्र, जिजामाता नागरी आरोग्य केंद्र, केडगाव नागरी आरोग्य केंद्र आणि नागापूर नागरी आरोग्य केंद्र येथे ही मोहिम राबविण्यात येत आहे.

हेही वाचा - सोलापुरात कंटेनरने तिघांना चिरडले, पुण्याच्या संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.