ETV Bharat / state

संगमनेर काँग्रेसच्या वतीने इंधन दरवाढीविरोधात केंद्र सरकारचा निषेध

author img

By

Published : Jun 7, 2021, 9:02 PM IST

Updated : Jun 7, 2021, 10:37 PM IST

इंधन दरवाढी विरोधात संगमनेर येथे मोदी सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. अच्छे दिनच्या ऐवजी बुरे दिन सुरू झाले आहेत, अशी टीका आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी यावेळी केली.

आंदोलक
आंदोलक

संगमनेर (अहमदनगर) - मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या भरमसाठ किमती वाढवून देशातील सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे. याच्या निषेधार्थ महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुक्यात विविध ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले आहे.

बोलताना आमदार डॉ. सुधीर तांबे

संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकी संघ, बोटा, मंगळापूर, निमगाव जाळी, तळेगाव दिघे या ठिकाणी पेट्रोल पंपावर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, इंद्रजीत थोरात, तालुकाध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, शिवाजीराव थोरात, शंकरराव खेमनर, सुनंदाताई जोर्वेकर, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे आदी उपस्थित होते.

आमदार डॉ. तांबे म्हणाले, मोदी सरकार हे भूलथापा देऊन सत्तेवर आलेले सरकार आहे. कोरोनाच्या संकटात मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलसह घरगुती गॅसचे दर भरमसाठ वाढ केलेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती अत्यंत कमी असताना नफेखोरीसाठी केंद्र सरकार सामान्यांना वेठीस धरत आहे. देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. बेरोजगारी वाढली आहे, सर्वत्र अशांतता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने ठोस निर्णय घेण्याऐवजी केंद्र सरकार मताचे राजकारण करून जनतेमध्ये फुट पाडत आहे.

यामुळे देशाची एकात्मता धोक्यात येऊ शकते. लोकशाही टिकवण्यासाठी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रीय झाले पाहिजे. यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंह व सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली याच स्थितीत असलेल्या कच्च्या तेलाच्या किमतीवेळेस पेट्रोल हे 60 रुपये लिटर होते. मात्र आता शंभर रुपयांच्या पुढे गेले आहे. अच्छे दिनच्या ऐवजी बुरे दिन सुरू झाले आहेत. त्यामुळे गोरगरीब आणि सामान्य माणूस अत्यंत वैतागलेला आहे. या सामान्य माणसाची अस्वस्थता सरकारने जाणून घेऊन तातडीने गोरगरिबांवर लागलेली भाववाढ कमी करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

हेही वाचा - शिर्डी साईमंदिर सुरू करा, अन्यथा आंदोलन; ग्रामस्थांचा इशारा

Last Updated : Jun 7, 2021, 10:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.