ETV Bharat / state

Babanrao Dhakane Dies : माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं निधन, हृदय विकाराच्या तीव्र झटक्यामुळे घेतला अखेरचा श्वास

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 27, 2023, 1:18 PM IST

Updated : Oct 27, 2023, 1:36 PM IST

Babanrao Dhakane Dies : अहमदनगर जिल्ह्याचे विकासपुरुष तथा माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं वयाच्या 87 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्यावर नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला, त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

Babanrao Dhakane Dies
माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे

अहमदनगर Babanrao Dhakane Dies : माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं हृदय विकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर अहमदनगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांनी गुरुवारी अखेरचा श्वास घेतला.

बबनराव ढाकणेंवर सुरू होते खासगी रुग्णालयात उपचार : माजी केंद्रीय कोळसा राज्यमंत्री बबनराव दादाबा ढाकणे यांना गेल्या काही दिवसापासून अहमदनगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना निमोनिया झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र गुरुवारी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच बबनराव ढाकणे यांचं निधन झाल्याची माहिती रुग्णालयाचे प्रमुख एस एस दीपक यांनी माध्यमांना दिली.

मुलानंही दिली सोशल माध्यमातून निधनाची माहिती : माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं खासगी रुग्णालयात निधन झालं. त्यांच्या निधनाचं वृत्त रुग्णालयाचे प्रमुख एस एस दीपक यांनी दिली आहे. यासह बबनराव ढाकणे यांच्या मुलानही बबनराव ढाकणे यांच्या निधनाची माहिती सोशल माध्यमातून दिली आहे. 'माझा अभिमान माझा संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे यांचं आज सकाळी साडेदहा वाजता निधन झालं आहे. अंतिम दर्शनासाठी त्यांचं पार्थिव आज दुपारी एक वाजतापासून ते शनिवारी एक वाजतापर्यंत हिंद वस्तीगृह पाथर्डी इथं ठेवण्यात येणार आहे. शनिवारी दोन वाजता त्यांच्या पार्थिवावर पागोरी पिंपळगाव इथं अंत्यविधी करण्यात येणार आहे.' अशी माहिती बबनराव ढाकणे यांच्या मुलानं सोशल माध्यमातून दिली आहे.

पंचायत समिती सदस्य ते केंद्रीय मंत्री : माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1937 ला अकोले इथं झाला होता. त्यांचं शिक्षण त्यांच्या जन्मगावातच 9 वी पर्यंत झालं आहे. मात्र 9 वी झालेल्या व्यक्तीनं आपल्या कर्तृत्वानं केंद्रीय मंत्री पदापर्यंत मजल मारली होती. संघर्षयोद्धा म्हणून बबनराव ढाकणे यांची अहमदनगर जिल्ह्याती ओळख होती. त्यांनी आपली पहिली निवडणूक पार्थडी विधानसभा मतदार संघातून 1978 ला लढवली होती. त्यानंतर त्यांनी राजकारणात अनेक पदं भूषवली आहेत. आपल्या राजकारणाची सुरुवात पंचायत समिती सदस्य म्हणून करणाऱ्या बबनराव ढाकणे यांनी केंद्रीय राज्यमंत्री म्हणूनही आपला कार्यकाळ गाजवला आहे.

हेही वाचा :

  1. Satara Accident : डोक्यावरून एसटीचे चाक गेल्याने शाळकरी मुलगी जागीच ठार; वाई आगारातील घटना
  2. Agniveer Akshay Gawate News: अग्निवीर सैनिकांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांना काही लाभ मिळत नसल्याची राहुल गांधींची टीका, सैन्यदलानं दिलं स्पष्टीकरण
Last Updated :Oct 27, 2023, 1:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.