ETV Bharat / state

पाय घसरुन पतीचा मृत्यू झाल्याचा पत्नीकडून बनाव, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 4, 2024, 7:24 AM IST

Shrirampur Crime News
Shrirampur Crime News

Shrirampur Crime News : अहमदनगरच्या श्रीरामपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. पत्नीनंच पतीचा खून केला. मात्र पाय घसरुन पतीचा मृत्यू झाल्याचा तिनं बनाव केला. पोलीस तपासात ही धक्कादायक माहिती समोर आलीय.

302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर Shrirampur Crime News : पती पाय घसरुन पडल्यानं पतीचा मृत्यू झाल्याचा बनाव करणाऱ्या पत्नीचा कारनामा काही तासांतच श्रीरामपूर पोलिसांनी उघडकीस आणलाय. स्वतः पत्नीनंच पतीच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन पतीची हत्या केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आल्यानंतर पोलिसांनी पत्नीस अटक केलीय.

नेमकं काय घडलं : श्रीरामपूर शहरातील अतिथी कॉलनीत राहणाऱ्या 40 वर्षीय संजय गवुजी भोसले याचा दारुच्या नशेत घरात पायरीवरुन पाय घसरुन मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या पत्नीनं श्रीरामपूर शहर पोलिसांना दिली होती. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. संजय भोसलेच्या मृत्यूनंतर पंचनामा करतेवेळी मयताच्या शरीरावरील जखमा पाहून पोलिसांना हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय आला. त्यानंतर पोलिसांनी त्यादृष्टीनं तपास सुरू केला. मृत संजय भोसले याच्या डोक्याला शस्त्रानं वार केल्यानं मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अहवालातून समोर आली.

चौकशीत पत्नीची हत्येची कबुली : वैद्यकीय अहवाल समोर येताच श्रीरामपूर पोलिसांनी मयताच्या पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. त्यावर पती संजय भोसले हा नेहमी दारू पिवुन त्रास देत होता, असे महिलेनं सांगितले. तसंच चारित्र्यवर संशय घेत असल्यानं पती-पत्नीत झालेल्या वादातून तिनं पतीच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून हत्या केल्याची कबुली दिली. अशी माहिती श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे यांनी दिलीय. या प्रकरणी श्रीरामपूर पोलिसांनी 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

यापुर्वीही घडली अशी घटना : श्रीरामपूर शहरालगत 21 सप्टेंबर रोजी दरोड्याचा बनाव करुन एका महिलेनं पतीची हत्या केली होती. त्यानंतर तपासात तो खुन दरोडेखोरांनी केला नसून पत्नीनंच पतीची हत्या केल्याची घटना समोर आली होती. या घटनेस 5 महिने उलटत नाही, तोच आता पुन्हा पत्नीनं पतीची हत्या करत बनाव केल्याची घटना समोर आलीय. दोन्ही घटनात पोलिसांच्या दक्षतेमुळे खुनी शोधण्यात पोलिसांना यश आलंय.

हेही वाचा :

  1. बिनव्याजी कर्जाचे आमिष दाखवून 400 ग्राहकांची 1 कोटींची फसवणूक, संचालकाला अटक
  2. म्हैस आणि रेड्याच्या चरबीपासून तूप बनविणाऱ्या कारखान्यावर छापेमारी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.