ETV Bharat / sports

Tokyo Olympics : आज दिवसभरातील भारतीय खेळाडूंच्या सामन्यांचे अपडेट, जाणून घ्या एका क्लिकवर

author img

By

Published : Jul 29, 2021, 9:00 AM IST

Updated : Jul 29, 2021, 5:11 PM IST

http://10.10.50.80//assam/23-July-2021/768-512-12546902-112-12546902-1627025576842_2307newsroom_1627028531_82.jpg
टोकियो ऑलिम्पिक 2020

17:11 July 29

साजन प्रकाशचे आव्हान संपुष्टात

स्विमिंग - साजन प्रकाश 100 मीटर बटर फ्लाय प्रकारात उपांत्य फेरी गाठण्यात अपयशी ठरला. तो या फेरीत दुसऱ्या स्थानावर राहिला.  

16:02 July 29

बॉक्सिंग - मेरी कॉमचा पराभव, पदकाच्या आशा धूळीस

बॉक्सिंगमध्ये भारताला जबर धक्का बसला. दिग्गज बॉक्सर मेरी कोमचा कोलंबियाच्या इंग्रिट लोरेना वार्लेशिया हिने 3-2 ने पराभव केला.  

14:07 July 29

मेरी कोमच्या सामन्याला थोड्याच वेळात सुरूवात

भारताची दिग्गज महिला बॉक्सर एमसी मेरी कोमच्या सामन्याला 3 वाजून 36 मिनिटानी सुरूवात होईल. अंतिम 16 च्या फेरीत मेरी कोमचा सामना कोलंबियाच्या इंग्रिट लोरेना वार्लेशिया हिच्याशी होत आहे.  

13:10 July 29

अर्जुन लाल जाट- अरविंद सिंह जोडीचे आव्हान संपुष्टात

रोवर - रोवर अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंह या जोडीने लाइटवेट डबल स्कल्स स्पर्धेत 11 वे स्थान पटकावले. यासह त्यांचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले. भारताकडून आतापर्यंतची ही सर्वश्रेष्ठ कामगिरी आहे.  

13:06 July 29

सेलिंग - नेत्रा कुमानन आठव्या फेरीत 31व्या स्थानावर

सेलिंग महिला वन पर्सन डिंगीच्या आठव्या रेसमध्ये नेत्रा कुमानन 20 व्या स्थानावर राहिली. तिचे ओवरऑल यादीतील स्थान 31 आहे.  

11:30 July 29

टोकियो ऑलिम्पिकमध्ये पी. व्ही. सिंधू, बॉक्सर सतीश कुमार यांच्यासह भारतीय हॉकी संघाने पदक जिंकण्याच्या दिशेने पाऊल टाकलं आहे. 

11:01 July 29

मनु भाकर- राही सरनोबतची आश्वासक सुरूवात

25 मीटर पिस्टूल प्रकारात मनु भाकर 5 व्या तर राही सरनोबत 25 व्या स्थानावर राहिली. दरम्यान, 25 मीटर पिस्तूल राउंडची दोन भागात विभागणी करण्यात आली आहे. यात आज प्रिसेशन राउंड पार पडला. उद्या शुक्रवारी रॅपिड राउंड होणार आहे. यातील एकूण स्कोरनंतर टॉप 8 चे खेळाडू फायनलसाठी पात्र ठरतील.  

09:13 July 29

अतनु दास उपउपांत्यपूर्व फेरीत

तिरंदाजी - अतनु दास उपउपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. त्याने कोरियाच्या खेळाडूविरोधात 6-5 ने विजय मिळत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली.  

09:11 July 29

सतीश कुमारची विजयी सुरूवात

बॉक्सिंग - सतीश कुमारने 91 किलो वजनी गटात विजयी सुरूवात केली. त्याने जमैकाच्या रिकार्डो ब्राउनचा 4-1 ने पराभव केला.  

09:08 July 29

पी. व्ही. सिंधू उपांत्य पूर्व फेरीत

बॅडमिंटन : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे. 

09:08 July 29

भारतीय पुरुष हॉकी संघाचा अर्जेंटिनावर विजय

हॉकी : भारतीय पुरूष हॉकी संघाने अर्जेटिनाचा 3-1 ने पराभव केला. भारताचा या स्पर्धेतील हा दुसरा विजय आहे. या विजयासह भारतीय संघ ग्रुप ए मध्ये 9 गुणांसह दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. 

09:08 July 29

तिरंदाज अतनु दास अंतिम 16 मध्ये दाखल

तिरंदाजी - भारताचा तिरंदाज अतनु दासने पुरूष एकेरी अंतिम 32 ची फेरी जिंकली. तो अंतिम 16 मध्ये पोहोचला आहे.  

09:08 July 29

राही सरनोबत कामगिरी

नेमबाजी -  जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या राही सरनोबतने 25 मीटर एअर पिस्तूल प्रकारात शानदार सुरूवात केली. ती पहिल्या सीरीज अखेर 96 गुणांसह टॉप 5 मध्ये राहिली. पण तिसऱ्या सीरीजमध्ये राही पिछाडीवर गेली. ती या सीरीजमध्ये 7 व्या स्थानावर घसरली. 

09:08 July 29

नौकानयन - भारताचे अरविंद आणि अर्जुन बी फायनलमध्ये पाचव्या स्थानावर राहिले. तर ओवरऑलमध्ये त्यांनी 11वे स्थान पटकावलं.  

08:52 July 29

Tokyo Olympics

टोकियो - टोकियो ऑलिम्पिकचा आज 7 वा दिवस आहे. आज गोल्फर, बॅडमिंटन, तिरंदाज, बॉक्सर, नौकानयन यांच्यासह भारतीय पुरूष हॉकी संघाचा सामना होणार आहे.  

Last Updated : Jul 29, 2021, 5:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.