ETV Bharat / sports

Tokyo Olympics: रौप्य विजेती मीराबाई चानूला मिळू शकतं सुवर्णपदक, चीनी खेळाडूची होणार डोपिंग चाचणी

author img

By

Published : Jul 26, 2021, 3:35 PM IST

Updated : Jul 26, 2021, 4:04 PM IST

भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानूचे रौप्य पदक, हे सुवर्ण पदकामध्ये बदलण्याच्या आशा वाढल्या आहेत. 49 किलो वजनी गटातील सुवर्णपदक विजेती झीहुई हाउ हिची डोपिंग चाचणी केली जाण्याची शक्यता आहे.

Tokyo Olympics: Weightlifter Hou to be tested by anti-doping authorities, silver medallist Chanu stands chance to get medal upgrade
Tokyo Olympics: Weightlifter Hou to be tested by anti-doping authorities, silver medallist Chanu stands chance to get medal upgrade

मुंबई - भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानूचे रौप्य पदक हे सुवर्ण पदकामध्ये बदलण्याच्या आशा वाढल्या आहेत. 49 किलो वजनी गटातील सुवर्णपदक विजेती झीहुई हाउ हिची डोपिंग चाचणी केली जाण्याची शक्यता आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.

मीराबाई चानूने 49 किलो वजनी गटात एकूण 202 किलो वजन उचलत रौप्य पदक जिंकले. मीराबाईने स्नॅचमध्ये 87 तर क्लीन अॅण्ड जर्कमध्ये 115 किलो वजन उचलले. या गटात चीनची झीहुई हाउने एकूण 210 किलो वजन उचलत सुवर्ण पदक जिंकले. तर इंडोनिशायाच्या विंडी केटिका आयशाह 194 किलो वजन उचलत कांस्य पदकाची विजेती ठरली. सुवर्णपदक विजेती झीहुई हाउ हिची अँटी डोपिंग अधिकाऱ्यांकडून चाचणी करण्यात येणार आहे. यात जर झीहुई हाउ दोषी आढळली तर तिच्याकडून सुवर्णपदक काढून घेतलं जाईल.

एएनआयला सूत्रांनी सांगितलं की, झीहुई हाउला टोकियोत राहण्यास सांगण्यात आले आहे. तिची टेस्ट केली जाणार आहे. दरम्यान, नियमानुसार जर खेळाडू डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळला तर त्याला अपात्र ठरवले जाते आणि त्यांच्याकडून पदकही काढून घेतले जाते. त्यानंतर ते पदक पुढील खेळाडूला दिले जाते. यामुळे मीराबाई चानूचे रौप्य पदक, सुवर्ण पदकामध्ये बदलण्याच्या आशा वाढल्या आहेत.

हेही वाचा - Tokyo Olympics: पराभवानंतर भवानी देवीने देशवासियांना म्हटलं, 'मला माफ करा'

हेही वाचा - Tokyo Olympics : काय खरचं मीराबाई चानूला सुवर्णपदक मिळणार?, जाणून घ्या सत्यता

Last Updated : Jul 26, 2021, 4:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.