ETV Bharat / sports

Tokyo Olympics : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंचे आजचे निकाल, जाणून घ्या एका क्लिकवर

author img

By

Published : Jul 27, 2021, 9:02 AM IST

Updated : Jul 27, 2021, 5:19 PM IST

Tokyo Olympics Day 5 live update
LIVE Tokyo Olympics : भारतीय हॉकी संघाचा स्पेनवर दणदणीत विजय

17:15 July 27

सेलिंग: भारताचा विष्णू सर्वानन पुरूष लेजर रेस ६ मध्ये १२व्या स्थानावर राहिला. 

13:10 July 27

सेलिंग : पुरुष लेजर रेसमध्ये विष्णू सर्वानन रेस ५ मध्ये २२व्या स्थानावर राहिला.  

13:10 July 27

सेलिंग: महिला लेजर रेडियल रेसमध्ये भारताची नेत्रा कुमानन सहाव्या रेसमध्ये ३८व्या स्थानावर राहिली.  

11:19 July 27

बॉक्सर लवलिनाच्या पंचने जर्मनीची खेळाडू घायाळ

बॉक्सिंग: महिला उपउपांत्यपूर्व फेरीत भारताच्या लवलिना बोर्गोहेनने जर्मनीच्या नदाइन अपेत्झचा पराभव केला. लवलिनाने हा सामना 3-2 ने जिंकला.  

10:36 July 27

सात्विकसाईराज-चिराग उपांत्यपूर्व फेरीच्या शर्यतीतून बाद

बॅडमिंटनमध्ये भारताची सात्विकसाईराज रंकारेड्डी आणि चिराग शेट्टीने ब्रिटनच्या बेन लेन आणि सीन वेंडी या जोडीचा पराभव केला. परंतु ते उपांत्यपूर्व फेरीच्या शर्यतीतून बाद झाले. ग्रुप ए मध्ये ते तिसऱ्या स्थानी राहिले. यामुळे त्यांचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले.  

10:36 July 27

नेमबाजीत भारताचे आणखी एक अपयश

नेमबाजी : भारताचे दिव्यांशसिंह पन्वर-इलावेनिल वालारिवान आणि दीपक कुमार-अंजुम मुदगिल १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत पात्र ठरण्यात अपयशी ठरले.  

09:59 July 27

भारताला ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का, शरथ कमलचा पराभव

टेबल टेनिस: पुरुष एकेरीमधील अचंता शरथ कमलच्या पराभवासह भारताच्या आशा संपुष्टात आल्या. शरथ कमलचा चीनच्या मा लाँग याने ७-११,११-८,११-१३,४-११,४-११ असा पराभव केला.  

09:10 July 27

भारतीय हॉकी संघाचा स्पेनवर दणदणीत विजय

हॉकी : भारतीय पुरूष हॉकी संघाने ग्रुप ए मधील साखळी फेरीत स्पेनचा ३-० ने धुव्वा उडवला. तीन सामन्यातील भारताचा हा दुसरा विजय आहे.  

09:07 July 27

भारतीय नेमबाजांची सुमार कामगिरी

नेमबाजी : १० मीटर एअर पिस्तूल  मिश्र सांघिक पात्रता फेरीच्या स्टेज २ मध्ये  भारतीय जोडी सौरभ चौधरी-मनू भाकर जोडीला अंतिम फेरीत प्रवेश करण्यात अपयश आले. तर अभिषेक वर्मा-यशस्विनी देसवाल जोडीचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.  

08:53 July 27

टोकियो ऑलिम्पिक 2020 चा आज पाचवा दिवस आहे. भारतासाठी दिवसाची सुरूवात नेमबाजी खेळाने झाली. 10 मीटर एअर पिस्टलच्या पात्रता फेरीत भारताकडून सौरभ चौधरी-मनु भाकर आणि अभिषेक वर्मा-यशस्विनी देसवाल जोडी मैदानात उतरली. पहिल्या फेरीत टॉपवर असलेली मनु-सौरभ जोडी दुसऱ्या फेरीत बाद झाली. तर अभिषेक यशस्विनी जोडी पहिल्याच फेरीत बाहेर झाली. भारतीय हॉकी संघाने स्पेनचा 3-0 ने धुव्वा उडवला.  

Last Updated : Jul 27, 2021, 5:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.