ETV Bharat / sports

ICC Women T20 World Cup 2023 : उपांत्य फेरीत भारताची होणार ऑस्ट्रेलियाशी लढत; पाहा यावरील सविस्तर रिपोर्ट

author img

By

Published : Feb 21, 2023, 7:28 PM IST

23 फेब्रुवारी रोजी होणार्‍या महिला टी-20 विश्वचषकाची भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरी निश्चित असल्याचे मानले जात आहे. ग्रुप 1 मध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे. तर भारत गट २ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण आज जर पाकिस्तानने इंग्लंडविरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकला तर पुढील सगळी समीकरणे बदलणार आहेत.

ICC Women T20 World Cup 2023
उपांत्य फेरीत भारताची होणार ऑस्ट्रेलियाशी लढत; पाहा यावरील सविस्तर रिपोर्ट

नवी दिल्ली : भारताने आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत गट २ मधून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या आयर्लंडबरोबरच्या सामन्यात भारताने विजय मिळवल्याने भारताचा उपांत्या फेरीतील प्रवेश सुकर झाला. पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईस पद्धतीने भारताने आयर्लंडविरुद्धचा सामना 5 धावांनी जिंकला, त्यामुळे भारताने 6 गुण मिळवून ग्रुप 2 मध्ये द्वितीय स्थान पटकावले.

इंग्लंड तीन विजयाने 6 गुणांसह पहिल्या स्थानावर : ग्रुप २ मधून इंग्लंड आधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे. भारताचे 4 पैकी 3 सामने जिंकून 6 गुण झाले आहेत. तर इंग्लंड 3 सामने खेळून तीनही विजयासह 6 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. आज इंग्लंडचा चौथा सामना पाकिस्तानशी आहे. हा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण सेमीफायनलमध्ये भारताचा सामना कोणत्या संघाशी होणार हे या सामन्यातून ठरणार आहे.

पहिला उपांत्य सामना 23 फेब्रुवारीला होणार : पहिला उपांत्य सामना 23 फेब्रुवारीला होणार आहे. ग्रुप 1 मध्ये ऑस्ट्रेलिया 8 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर भारत गट २ मध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. उपांत्य फेरीचे गणित असे सांगते की गट 1 मधील क्रमांक 1 संघ (सध्याचा ऑस्ट्रेलिया) गट 2 मधील दुसर्‍या क्रमांकाच्या संघाशी (वर्तमान भारत) खेळेल. त्याचप्रमाणे दुसरा उपांत्य सामना 24 फेब्रुवारीला होणार आहे. यामध्ये गट 1 (सध्याचा न्यूझीलंड) मधील दुसरा क्रमांक गट 2 (सध्याचा इंग्लंड) सोबत असेल. मात्र, आज होणार्‍या इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान सामन्यात मोठा अपसेट झाला तर उपांत्य फेरीतील संघ बदलणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पाकिस्तानने इंग्लंडला मोठ्या फरकाने पराभूत केले तर : आजच्या पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडला मोठ्या फरकाने पराभूत केले तर पाकिस्तानचे 4 गुण होतील, पण नेट रन रेटमध्ये इंग्लंडचे खूप नुकसान होईल. अशा परिस्थितीत नेट रन रेट कमी झाल्यामुळे इंग्लंड दुसऱ्या स्थानावर येईल आणि भारत ग्रुप 2 मध्ये पहिल्या स्थानावर विराजमान होईल. अशा प्रकारे भारताला उपांत्य फेरीत न्यूझीलंडशी खेळावे लागणार आहे. मात्र, इंग्लंडला हरवणे पाकिस्तानसाठी इतके सोपे नसेल. इंग्लंडने आतापर्यंतचे तिन्ही सामने जिंकले आहेत.

भारताकडून आयर्लंडचा पराभव : महिला T20 विश्वचषक स्पर्धेत भारताने डकवर्थ लुईस पद्धतीने आयर्लंडचा 5 धावांनी पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 155 धावा केल्या. प्रत्युत्तरात, आयर्लंडच्या फलंदाजीदरम्यान 8.2 षटकांत पाऊस पडला. यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला सामना विजेता घोषित करण्यात आले. भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारून डावाला सुरुवात केली. टीम इंडियाकडून शेफाली वर्मा आणि स्मृती मंधानाने भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. परंतु, संघाच्या 62 धावसंख्येवर शेफाली डेलानीच्या चेंडूवर झेलबाद झाली. भारताला हा पहिला धक्का होता.

हेही वाचा : Border Gavaskar Trophy : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सामन्यांचा इतिहास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.