ETV Bharat / sports

Ind vs Bang First Test Match : भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी सामना अपडेट; तिसऱ्या दिवशी बांगलादेशच्या सर्वबाद 150 धावा

author img

By

Published : Dec 16, 2022, 11:45 AM IST

Updated : Dec 16, 2022, 2:07 PM IST

भारतीय संघाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवच्या ( Indian Team Chinaman Bowler Kuldeep Yadav ) गोलंदाजीमुळे बांगलादेशवर ( Due to Kuldeep Yadav Follow on Crisis For Bangladesh ) फॉलोऑनचे संकट निर्माण ( Bangladesh Team Scored 150 Runs After Losing all Wickets ) झाले आहे. वृत्त लिहिपर्यंत सामन्याच्या तिसऱ्या दिवशी बांगलादेश संघाने 9 गडी गमावून 149 धावा केल्या होत्या. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी कुलदीप यादवने दुसरा धक्का देत पाचवी विकेट मिळवली

Ind vs Bang First Test Match
भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी सामना अपडेट; तिसऱ्या दिवशी बांगलादेशच्या सर्वबाद 150 धावा

चितगाव : भारतीय संघाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवच्या ( Indian Team Chinaman Bowler Kuldeep Yadav ) गोलंदाजीमुळे बांगलादेशवर फॉलोऑनचे संकट निर्माण झाले ( Due to Kuldeep Yadav Follow on Crisis For Bangladesh ) आहे. वृत्त लिहिपर्यंत सामन्याच्या तिसऱ्या दिवशी बांगलादेश संघाने 9 गडी गमावून 149 धावा केल्या ( Bangladesh Team Scored 150 Runs After Losing all Wickets ) होत्या. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी कुलदीप यादवने दुसरा धक्का देत पाचवी विकेट मिळवली. पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी कुलदीप यादव आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांच्या घातक गोलंदाजीने यजमान बांगलादेशला धक्का बसला. बांगलादेशने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताच्या 404 धावांचा पाठलाग करताना 133 धावांत 8 विकेट गमावल्या होत्या.

कसोटीचा दुसरा दिवस भारतीय संघासाठी उत्तम ठरला : पहिल्या कसोटीचा दुसरा दिवस भारतीय संघासाठी अतिशय प्रेक्षणीय ठरला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना रविचंद्रन अश्विन (58) आणि कुलदीप यादव (40) यांनी चांगली फलंदाजी करीत भारताला 404 धावांपर्यंत नेले. यानंतर मोहम्मद सिराजने बांगलादेशच्या आघाडीच्या फळीला उखडून काढले. यानंतर कुलदीपने शानदार गोलंदाजी करीत बांगलादेशच्या फलंदाजांना आपल्या लेगस्पिन आणि गुगलीने नाचवत ठेवले.

भारताने पहिल्या दिवशी केली दमदार सुरुवात : चेतेश्वर पुजारा (90) आणि युवा फलंदाज श्रेयस अय्यर (नाबाद 82) यांच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीच्या पहिल्या दिवशी बुधवारी 6 गडी गमावून 278 धावा केल्या. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने दमदार सुरुवात केली आणि सलामीच्या भागीदारीत 41 धावांची भर घातली. पण, त्यानंतर 48 धावांवर जात असताना भारताने तीन विकेट गमावल्या. भारताची चौथी विकेट 112 धावांवर पडली. मात्र, यानंतर पुजारा आणि अय्यर यांनी पाचव्या विकेटसाठी 149 धावांची मोठी भागीदारी केली. भारताने दिवसाच्या शेवटच्या षटकात पुजारा आणि अक्षर पटेल यांच्या विकेट्स गमावल्या आणि भारताची धावसंख्या सहा विकेट्सवर 278 अशी झाली.

Last Updated : Dec 16, 2022, 2:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.