ETV Bharat / sports

India vs Bangladesh 2nd Test : कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताची आक्रमक गोलंदाजी; लंचपर्यंत बांगलादेशची धावसंख्या 4 बाद 82 धावा

author img

By

Published : Dec 24, 2022, 12:24 PM IST

भारत विरुद्ध बांगलादेश दुसऱ्या कसोटी ( India vs Bangladesh 2nd Test ) सामन्यात मीरपूरच्या शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ( Test Being Played Between India and Bangladesh ) तिसऱ्या दिवशी भारताने सुरुवातीच्या षटकांमध्येही ( India vs Bangladesh 2nd Test Match ) आक्रमक गोलंदाजी करीत बांगलादेशला धक्का दिला ( So Far Bangladesh have Lost 4 For 82 Runs ) आहे. लंचपर्यंत त्यांचे 4 खेळाडू बाद झाले आहेत.

India vs Bangladesh 2nd Test Match Third Day Live Match Update
कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताची आक्रमक गोलंदाजी; लंचपर्यंत बांगलादेशची धावसंख्या 4 बाद 82 धावा

ढाका : मीरपूरच्या शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ( Test Being Played Between India and Bangladesh ) भारताने सुरुवातीच्या षटकांमध्येही ( India vs Bangladesh 2nd Test ) बांगलादेशला धक्का देत त्यांची सुरुवात बिघडवून ( India vs Bangladesh 2nd Test Match ) दिली. वृत्त लिहीपर्यंत बांगलादेशने दुसऱ्या डावात 2 गडी गमावून 26 धावा केल्या. आज सामन्याच्या दुसऱ्याच षटकात ( So Far Bangladesh have Lost 4 For 82 Runs ) अश्विनने नजमुल हुसेन शांतोला बाद करीत बांगलादेशला पहिला धक्का दिला. यानंतर सिराजने मोमीन-उल-हकला पंतच्या गोलंदाजीवर विकेटच्या मागे झेलबाद केले. दोन्ही खेळाडू केवळ 5-5 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले.

ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताच्या ३१४ धावा पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने ३१४ धावा केल्या. अशा प्रकारे बांगलादेशविरुद्ध 87 धावांची आघाडी मिळवली. त्याचवेळी, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशने २० षटकांत एकही विकेट न गमावता ४० धावा केल्या होत्या. सलामीवीर झाकीर हसन (2) आणि नजमुल हुसेन शांतो (5) नाबाद माघारी परतले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा यजमान बांगलादेश संघ भारताच्या 80 धावांनी मागे होता.

भारताच्या गोलंदाजांचे कसोटीवर वर्चस्व भारताच्या गोलंदाजांनी ढाका येथे आक्रमक गोलंदाजी करीत कसोटीवर आपले वर्चस्व राखले. कारण त्यांनी लंच ब्रेकपर्यंत यजमान संघाचे चार गडी बाद केले. अजूनही 16 धावांनी बांगलादेश पिछाडीवर आहे. बांगलादेशने सकाळच्या सत्रात भारताचा फायदा संपुष्टात आणण्याच्या आशेने 0 बाद 7 अशी सुरुवात केली. परंतु, आर अश्विन, मोहम्मद सिराज, जयदेव उनाडकट आणि अक्षर पटेल या भारताच्या चौकडीने केलेल्या घातक गोलंदाजीमुळे बांगलादेशला धक्का दिला आहे.

आर अश्विनची उत्तम गोलंदाजी झाकीर हसन आणि नजमुल हुसेन शांतो या दोन डावखुऱ्या सलामीवीरांविरुद्ध अश्विनने आक्रमक गोलंदाजी करीत छान सुरुवात केली आणि लगेचच विकेट मिळवली. त्याच्या गोलंदाजीला चेंडू चांगला टर्न घेत होता आणि बाउन्सदेखील होत होता. भारताच्या प्रमुख फिरकीपटूने दिवसाच्या सुरुवातीच्या षटकात नजमुलला दोनदा त्रास दिला. नजमुल प्रथमच निसटला, ज्यामुळे भारताने एलबीडब्ल्यूसाठी रिव्ह्यू गमावला, परंतु पुढच्या चेंडूवर तो पुरेसा भाग्यवान नव्हता कारण तो लेग बिफोर पायचीत झाला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.