ETV Bharat / sports

भारताची धावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांची बंदी!

author img

By

Published : Jul 20, 2019, 11:43 AM IST

23 वर्षीय संजीवनीने 2019 च्या आशियाई चॅम्पियनशिपच्या दहा हजार मीटर शर्यतीमध्ये कांस्यपदक जिंकले होते.

भारताची धावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांची बंदी!

नवी दिल्ली - भारताची आघाडीची आणि लांब पल्ल्याची धावपटू संजीवनी जाधव हिच्यावर आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने दोन वर्षांच्या निलंबनाची शिक्षा ठोठावली आहे. उत्तेजक द्रव्य सेवन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

23 वर्षीय संजीवनीने 2019 च्या आशियाई चॅम्पियनशिपच्या दहा हजार मीटर शर्यतीमध्ये कांस्यपदक जिंकले होते. संजीवनीवर लागलेली बंदी ही जूनच्या 29 तारखेपासून सुरू झाली आहे. त्यामुळे या तारखेनंतर तिने मिळवलेली बक्षिसे आणि रोखरक्कम रद्द ठरवण्यात येणार आहेत.

संजीवनीने या शिक्षेबद्दलची चूक मान्य केली असून लवादासमोर तिने आपल्याला कमी शिक्षा देण्यात यावी, असे म्हटले आहे.

Intro:Body:

भारताची धावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांची बंदी!

नवी दिल्ली - भारताची आघाडीची आणि लांब पल्ल्याची धावपटू संजीवनी जाधव हिच्यावर उत्तेजक द्रव्य सेवन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने दोन वर्षांच्या निलंबनाची शिक्षा ठोठावली आहे.

23 वर्षीय संजीवनीने 2019 च्या आशियाई चॅम्पियनशिपच्या दहा हजार मीटर शर्यतीमध्ये कांस्यपदक जिंकले होते. संजीवनीवर लागलेली बंदी ही जूनच्य़ा 29 तारखेपासून सुरु झाली आहे. त्यामुळे या तारखेनंतर तिने मिळवलेली बक्षिसे आणि रोखरक्कम रद्द ठरवण्यात येणार आहेत.

संजीवनीने या शिक्षेबद्दलची चूक मान्य केली असून लवादासमोर तिने आपल्याला कमी शिक्षा देण्यात यावी असे म्हटले आहे.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.