ETV Bharat / sports

India 21 Member Squad : 17 वर्षांखालील फिफा महिला विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, 'या' खेळाडूंना मिळाली संधीओ

author img

By

Published : Oct 7, 2022, 1:13 PM IST

17 वर्षांखालील फिफा महिला विश्वचषक ( FIFA U 17 Womens World Cup ) स्पर्धेसाठी 21 सदस्यीय भारतीय संघाची ( FIFA under 17 world cup ) निवड करण्यात आली आहे. 11 ते 30 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा भुवनेश्वर, मडगाव (गोवा) आणि नवी मुंबई येथे होणार आहे. भारतीय महिला फुटबॉल संघ प्रथमच फिफा विश्वचषक स्पर्धेत सहभागी होत आहे.

FIFA
FIFA

भुवनेश्वर: 17 वर्षांखालील भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक थॉमस डेनरबी ( Head coach Thomas Dennerby ) यांनी 11 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या फिफा 17 वर्षांखालील विश्वचषक ( FIFA under 17 world cup ) स्पर्धेसाठी 21 जणांचा संघ जाहीर ( India Announce 21 Member Squad ) केला आहे. यजमान भारताला यूएसए, मोरोक्को आणि ब्राझीलसह अ गटात ठेवण्यात आले आहे. भारतीय संघ 11 ऑक्टोबरला अमेरिकेविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. त्यानंतर संघ 14 आणि 17 ऑक्टोबरला अनुक्रमे मोरोक्को आणि ब्राझीलविरुद्ध खेळेल. ओडिशातील भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर भारताचे सामने होणार आहेत.

मुख्य प्रशिक्षक थॉमस डेनरबी ( Head coach Thomas Dennerby ) म्हणाले, 'ही प्रत्येकासाठी नवीन परिस्थिती आहे. भारताने यापूर्वी कधीही वर्ल्ड कप खेळलेला नाही. हा पूर्णपणे वेगळ्या स्तराचा खेळ असेल. ते म्हणाले, 'आम्ही चांगली तयारी केली आहे आणि आम्हाला कोणीही सहज हरवू शकत नाही, हे दाखवण्याची संधी आम्हाला मिळेल. या स्पर्धेचे सामने 11 ते 30 ऑक्टोबर दरम्यान भुवनेश्वर, मडगाव (गोवा) आणि नवी मुंबई येथे होणार आहेत.

भारतीय प्रशिक्षक म्हणाले, 'जेव्हा तुम्ही मैदानात असता तेव्हा सर्व काही मागे राहते आणि तुम्हाला फक्त खेळावर लक्ष केंद्रित करावे लागते. मुलींनी हेच करायला हवं. आम्ही विजयाचा दावेदार म्हणून स्पर्धेत उतरणार नाही. मला विश्वास आहे की प्रतिस्पर्धी संघांवर दबाव असेल.

21 सदस्यीय संघात मोनालिसा देवी मोइरंगथम, मेलोडी चानू कीशम, अंजली मुंडा ( Anjali Munda ) यांना गोलरक्षकाची भूमिका देण्यात आली आहे. अस्तम ओराव, काजल, नकेता, पूर्णिमा कुमारी, वर्षाका, शिल्की देवी ( Shilki Devi ) यांची बचावपटू म्हणून निवड करण्यात आली आहे. बबिना देवी लिशम, नीतू लिंडा, शैलजा, शुभांगी सिंग मिडफिल्डर म्हणून खेळतील. अनिता कुमारी, लिंडा कोम सरतो, नेहा, रेगिया देवी लैश्राम, शेलिया देवी लोकटोंगबम, काजोल ह्युबर्ट डिसूझा, लावण्य उपाध्याय, सुधा अंकिता तिर्की या संघाच्या फॉरवर्ड्स असतील.

हेही वाचा - Jasprit Bumrah Best Replacement : 'हे' 3 गोलंदाज विश्वचषकात बुमराहची जागा घेण्यास तयार, पाहा कोण आहे प्रबळ दावेदार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.