ETV Bharat / sports

ICC Cricket World Cup 2023 : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी खेळाडूंपुढं मोठ्ठं आव्हान, करावी लागणार 'या' चाचण्यांची शर्यत पार

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 24, 2023, 1:16 PM IST

भारतीय क्रिकेट संघात निवडीसाठी खेळाडूंना विविध चाचण्यांना तोंड द्यावं लागतं. आता तर विश्वचषक क्रिकेट स्पर्धा तोंडावर आली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघात निवड झालेल्या खेळाडूंना विविध चाचण्यांना सामोरं जावं लागणार आहे.

ICC Cricket World Cup 2023
संपादित छायाचित्र

नवी दिल्ली : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला काही दिवसात सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी क्रिकेटपटूंना मोठ्या आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंना आपण तंदुरुस्त असल्याचं सिद्ध करावं लागणार आहे. त्यासाठी विविध चाचण्या करण्यात येणार असल्याची माहिती बीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी ( NCA ) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI ) वैद्यकीय पथकाकडून वेळोवेळी या खेळाडूंच्या वैद्यकीय चाचण्या घेतल्या जातात. मात्र यावर्षी विश्वचषक असल्यानं भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI ) कोणताही धोका पत्करायला तयार नसल्याचं या सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं आहे.

खेळाडूंना पार कराव्या लागणार 'या' चाचण्या : भारतीय क्रिकेट संघातील काही खेळाडूंनी नुकतीच आयर्लंडमध्ये टी20 मालिका खेळली आहे. आयर्लंडमध्ये खेळलेल्या खेळाडूंना ही चाचणी करण्याची गरज नाही. मात्र बहुतेक खेळाडूंना फिटनेस चाचणी देणं बंधनकारक असेल. त्यांना रक्त चाचणीही करणं गरजेचं आहे. खेळाडूंच्या चाचणीसाठी आवश्यक असलेले सगळे पॅरामीटर्स तपासले जातील. यात लिपिड प्रोफाइल, रक्तातील साखर, यूरिक ऍसिड, कॅल्शियम, जीवनसत्त्वे B12 आणि डी, क्रिएटिनिन, टेस्टोस्टेरॉन आदींचा समावेश आहे. काहीवेळा DEXA चाचणी देखील करण्यात येते. खेळाडूंच्या हाडांची घनता तपासण्यासाठी ही चाचणी वापरली जाते.

खेळाडूंसाठी यात काहीही नवीन नाही : आगामी विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड करण्यात येणार आहे. या निवड करण्यात आलेल्या खेळाडूंना फिटनेस चाचण्या देणं बंधनकारक आहे. मात्र खेळाडूंसाठी यात काहीही नवीन नसल्याचं राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील एका पदाधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं आहे. एखाद्या मालिकेच्या मध्येच खेळाडू ब्रेक घेतात, तेव्हा या चाचण्या करण्यात येतात. खेळाडूंकडं वैयक्तिक आहार चार्ट आणि शरीराच्या गरजेनुसार प्रशिक्षण मॉड्यूल आहेत. मात्र तरीही 8 ते 9 तास शांत झोप घेतल्यास दुखापत होण्याची शक्यता कमी असते, असेही त्यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा -

  1. India Vs Ireland 2nd T20: कर्णधार म्हणून बुमराहनं जिंकली पहिली मालिका; आयसीसीकडून कौतुक
  2. Asia Cup 2023 Team India Squad : आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा, चहल आणि आर. अश्विनला डच्चू
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.