ETV Bharat / sports

ICC Women T20 World Cup 2023 : इंग्लडचा पाकिस्तानवर दणदणीत विजय; सेमीफायनलचे संघ जाहीर, भारताची होणार 'या' टीमशी लढत

author img

By

Published : Feb 22, 2023, 1:11 PM IST

आयसीसी ICC महिला T20 विश्वचषकाच्या गट 2 च्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 114 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने पाच गड्यांच्या मोबदल्यात 213 धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानचा संघ नऊ गड्यांच्या मोबदल्यात 99 धावाच करू शकला.

ICC Women T20 World Cup 2023
इंग्लडचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

केपटाऊन : आयसीसी महिला विश्वचषक 2023 मध्ये इंग्लंडने मंगळवारी त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात पाकिस्तानवर ११४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील गट दोनमधील आपले अव्वल स्थान कायम राखले. इंग्लंडचा हा विजय म्हणजे ब गटात दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या भारतीय संघाला उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाच्या बलाढ्य संघाचे आव्हान पेलावे लागणार आहे. गट 'ब'मध्ये इंग्लंडने चारपैकी चार सामने जिंकू आठ गुण प्राप्त केले आहेत. उपांत्य फेरीत त्यांची लढत गट 'अ' मधील दुसऱ्या स्थानावरील संघाशी होईल.

इंग्लडने सामना जिंकल्यानंतर होणारी स्थिती : भारताने चारपैकी तीन सामने जिंकले आणि गट 'ब'मध्ये सहा गुणांसह दुसरे स्थान पटकावले. उपांत्य फेरीत गुरुवारी त्यांचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. ज्यांनी गट 'अ' मधील चारही सामने जिंकले आणि आठ गुणांसह पहिले स्थान मिळवले. इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पाच गडी गमावून 213 धावा केल्या. महिला टी-20 विश्वचषकात एखाद्या संघाने 200 धावांचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

इंग्लडची फलंदाजी : इंग्लडच्या फलंदाजांनी जोरदार बॅटींग करीत निर्धारित 20 षटकांत 5 विकेट गमावून 213 धावा केल्या होत्या. त्यांनी विजयासाठी पाकिस्तानला 214 धावांचे लक्ष्य दिले होते. सलामीवर डुनक्ले अवघ्या 2 धावांवर लवकरच बाद झाली. त्यानंतर आलेली अलीस कॅप्सेसुद्धा 6 धावा करून मैदानाबाहेर आली. त्यानंतर आलेल्या नॅट स्किव्हर ब्रुंटने शानदार फलंदाजी करीत 40 चेंडूत शानदार 81 धावांची नाबाद खेळी केली. त्याचबरोबर डी वॅटने 33 चेंडूत 59 धावांची फटकेबाजी करीत संघाच्या धावसंख्येला विशेष आकार दिला.

पाकिस्तानची फलंदाजी : पाकिस्तानचा संघ कोणत्याही वेळी लक्ष्य साध्य करण्याच्या स्थितीत दिसत नव्हता. टीम पाकिस्तानच्या चारच फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. त्यापैकी नवव्या क्रमांकाची फलंदाज तुबा हसनने सर्वाधिक 28 धावा केल्या, इंग्लंडकडून कॅथरीन सायव्हर-ब्रंट आणि शार्लोट डीनने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. पाकिस्तानकडून सुरुवातच दयनीय झाली त्यांची सलामीवीर सदाफ शामस ही खाते न उघडता पॅव्हेलिनमध्ये परतली. त्यानंतर लागोपाठ विकेट ढासळत गेल्या. पाकिस्तानच्या 33 धावांवर 4 विकेट गेल्या होत्या. मुनेबा अली, ओमिमा सोहली, सिद्रा अमीन ही वरची फळी अवघ्या 40 धावांच्या आत पॅव्हेलिनमध्ये परतली होती.

पाकिस्तानच्या संघाचे अपयश : पाकिस्तानच्या संघाला निर्धारित 20 षटकांत नऊ गडी गमावून 99 धावाच करता आल्या. इंग्लंडच्या विजयात नॅट सायव्हर ब्रंटने महत्त्वाची भूमिका बजावली. तिने 40 चेंडूत 12 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 81 धावा केल्या. सलामीवीर डॅनियल व्हाईटने ३३ चेंडूत ५९ धावा करून इंग्लंडला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांशिवाय एमी जोन्सने 31 चेंडूत 47 धावांची आक्रमक खेळी खेळली.

हेही वाचा : IPL 2023 Streaming in 12 languages : आता 12 भाषांमध्ये पाहू शकाल मोफत लाईव्ह आयपीएल; कसे ते जाणून घ्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.