ETV Bharat / sports

Home Minister Amit Shah : ऑलिम्पिक 2036 च्या यजमानपदाचा भारतकडून दावा; अमित शाह यांनी यजमानपदासाठी घेतली समीक्षा बैठक

author img

By

Published : Dec 17, 2022, 5:17 PM IST

ऑलिम्पिक 2036 च्या यजमानपदाचा दावा सादर करण्याच्या तयारीचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( Union Home Minister Amit Shah ) यांनी ( Amit Shah Met Gujarat CM ) आढावा घेतला ( Gujarat CM Bhupendra Patel ) आहे. ऑलिम्पिक खेळाच्या यजमानपदासाठी अमित शहा यांनी समीक्षा बैठक घेतली.

Amit Shah Reviews Preparations to Stake Claim to Host Olympics 2036
ऑलिम्पिक 2036 च्या यजमानपदासाठी अमित शाह यांनी घेतली समीक्षा बैठक

अहमदाबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( Union Home Minister Amit Shah ) यांनी शुक्रवारी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल ( Gujarat CM Bhupendra Patel ) आणि ( Amit Shah Met Gujarat CM ) इतर उच्च सरकारी ( Gujarat CM Bhupendra Patel ) अधिकाऱ्यांची 2036 उन्हाळी ऑलिम्पिकच्या यजमानपदाच्या बोलीचा आढावा घेण्यासाठी भेट घेतली. हे लक्षात घ्यावे की, गुजरातमधील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने यापूर्वी 2036 ऑलिम्पिक खेळांचे यजमानपद जिंकणे हे आपले उद्दिष्ट असल्याचे जाहीर केले होते.

शाह यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसह मोठे अधिकारी : यजमानपदासाठी अधिकारी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC) संपर्कात असतील. अधिकृत प्रसिद्धीनुसार, शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री पटेल, गुजरातचे क्रीडा राज्यमंत्री हर्ष सांघवी, मुख्य सचिव पंकज कुमार, अहमदाबाद महापालिका आयुक्त एम थेनरसन आणि क्रीडा सचिव अश्वनी कुमार आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.