ETV Bharat / sports

भारताने कोरोनामुळे एकाच दिवशी २ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना गमावलं

author img

By

Published : May 8, 2021, 10:00 PM IST

आज हॉकीपटू रविंदर पाल सिंह यांच्या पाठोपाठ एम के कौशिक यांचं कोरोनाने निधन झालं आहे.

Moscow Olympic gold medallist and former hockey coach MK Kaushik dead due to Covid-19
भारताने कोरोनामुळे एकाच दिवशी २ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना गमावलं

नवी दिल्ली - आज हॉकीपटू रविंदर पाल सिंह यांच्या पाठोपाठ एम के कौशिक यांचं कोरोनाने निधन झालं आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.

कौशिक यांना १७ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांना दिल्लीतील एका नर्सिग होममध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची परिस्थिती गंभीर होती. आज त्यांच्या तब्येतीत आणखी बिघाड झाल्याने त्यांना वेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. उपचारादरम्यान, त्यांची प्राणज्योत मावळली. कौशिक यांच्यासोबत त्यांच्या पत्नीला देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावरही याच नर्सिंग होममध्ये उपचार सुरू आहेत.

कौशिक यांचे भारतीय हॉकी संघात महत्वाचे स्थान होते. १९८० सालच्या मॉक्सो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचे ते सदस्य होते. तसेच कौशिक भारताच्या सिनिअर पुरूष आणि महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक देखील राहिले आहेत. २००२ साली त्यांच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात भारतीय हॉकी संघाने कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली होती.

हेही वाचा - सुवर्णपदक विजेते हॉकीपटू रविंदर पाल सिंह यांचे कोरोनाने निधन

हेही वाचा - भारताचे माजी हॉकीपटू बलबीर सिंग (धाकटे) यांचे निधन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.