ETV Bharat / sports

टोकियो ऑलिम्पिक : भारतीय पुरुष हॉकी संघाची जपानवर 5-3 ने मात

author img

By

Published : Jul 30, 2021, 5:20 PM IST

भारतीय पुरुष हॉकी टीमने टोकियो ऑलिम्पिकमध्ये साखळी गटात चमकदार खेळाचे प्रदर्शन केले. भारतीय संघाने साखळीतील अंतिम सामन्यात यजमान जपान संघाचा 5 विरुद्ध 3 गोलने पराभव केला.

-tokyo-olympics
-tokyo-olympics

टोकियो - टोकियो ऑलिम्पिकच्या आठव्या दिवशी भारताने आणखी एक मेडल पक्के केले आहे. महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेन हिने 69 किलो वर्गगटात सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. लवलीनाने बॉक्सिंगमध्ये पहिले पदक जवळपास निश्चित केले आहे.

बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधुने जोरदार प्रर्दशन करत तिनेही सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. सिंधु पदक जिंकण्यापासून केवळ एक विजय दूर आहे. दरम्यान नेमबाज दीपिका कुमारी महिला गटात क्वार्टर फायनल सामन्यात पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडली आहे.

भारतीय पुरुष हॉकी टीमने टोकियो ऑलिम्पिकच्या अंतिम साखळी सामन्यात जपानला 5-3 ने नमवले. भारतीय संघाचा हा चौथा विजय आहे. भारतीय संघाने स्पेन, न्यूझीलंड आणि अर्जेंटीना संघालाही धूळ चारली आहे. भारताला आतापर्यंत केवळ एकाच सामन्यात पराभव सहन करावा लागला आहे.

भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाकडून 1-7 असा दारुण पराभव झाला आहे. आज जपानविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताकडून दोन गोल गुरजंत, दोन गोल हरमनप्रीत सिंह आणि एक गोल नीलकांता शर्मा यांनी केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.