ETV Bharat / sports

तब्बल ३५ वर्षानंतर शूटआऊटमध्ये भारताची ऑस्ट्रेलियावर सरशी

author img

By

Published : Feb 23, 2020, 4:06 PM IST

१९८५ च्या इंदिरा गांधी गोल्ड कपमध्ये भारताने शूटआऊटमध्ये विजय मिळवला होता. आता २५ एप्रिल रोजी भारत जर्मनीशी दोन हात करणार आहे.

india beat australia in shootout of FIH Hockey Pro League 2020
तब्बल ३५ वर्षानंतर शूटआऊटमध्ये भारताची ऑस्ट्रेलियावर सरशी

नवी दिल्ली - प्रो हॉकी लीग सामन्यात झालेल्या शूटआऊटमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला ३-१ असे पराभूत केले. पूर्णवेळ होईपर्यंत दोन्ही संघांची २-२ अशी गोलसंख्या होती. शूटआऊटमध्ये हरमनप्रीत सिंग, विवेक प्रसाद आणि ललित उपाध्याय यांनी गोल केले. आत्तापर्यंत दोन्ही संघांमध्ये पाचवेळा शूटआऊट सामने झाले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाने तीन वेळा तर दोन वेळा भारताने विजय मिळवला आहे.

हेही वाचा - काय सांगता!...८३ वर्षाच्या वेटलिफ्टरवर डोपिंगप्रकरणी बंदी

१९८५ च्या इंदिरा गांधी गोल्ड कपमध्ये भारताने शूटआउटमध्ये विजय मिळवला होता. यापूर्वीच्या पहिल्या सामन्यात भारताकडून हरमनप्रीत आणि रुपिंदरने गोल केले. सामना जिंकल्यानंतर भारताला ३५ गुण मिळाले आहेत. आता २५ एप्रिलला भारत जर्मनीशी दोन हात करणार आहे.

पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सरशी -

पहिल्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने ४-३ असा विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियाचा हा भारतावर ८५ वा विजय होता. या सामन्यात भारताने शेवटच्या सत्रामध्ये दोन गोल करत सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना विजय मिळवता आला नाही. भारताकडून राजकुमार पालने दोन आणि रुपिंदरपाल सिंगने एक गोल केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.