ETV Bharat / sports

डुरंड कप 2021 मध्ये 5 आयएसएल आणि 3 आय लीगमधील संघ खेळणार

author img

By

Published : Aug 23, 2021, 6:31 PM IST

डुरंड कप फुटबॉल स्पर्धेत 16 संघाचा सहभाग असणार आहे. यात इंडियन सुपर लीग (आयएसएल) च्या पाच फ्रेंचायझी आणि आय लीगमधील तीन संघाचा समावेश आहे.

2021 Durand Cup to have five ISL and three I-league teams
डुरंड कप 2021 मध्ये 5 आयएसएल आणि 3 आय लीगमधील संघ खेळणार

कोलकाता - यंदाच्या डुरंड कप फुटबॉल स्पर्धेत 16 संघाचा सहभाग असणार आहे. यात इंडियन सुपर लीग (आयएसएल) च्या पाच फ्रेंचायझी आणि आय लीगमधील तीन संघाचा समावेश आहे. दरम्यान, ही स्पर्धा पाच सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर या काळात होणार आहे.

डुरंड कप फुटबॉल स्पर्धेचा यंदाचा हा 130वा हंगाम आहे. याआधी ही स्पर्धा दिल्लीमध्ये खेळली जात होती. पण 2019 पासून याचे आयोजन कोलकातामध्ये करण्यात येत आहे. पारंपरिक पद्धतीने भारतीय सेना आणि सशस्त्र दलाकडून याचे आयोजन करण्यात येते. पश्चिम बंगाल सरकार आणि भारतीय सेना या स्पर्धेचे संयुक्तपणे आयोजन करतं.

डुरंड कप फुटबॉल स्पर्धेत आयएसएल फ्रेंचायझी एफसी गोवा, बंगळुरू एफसीशिवाय भारताचे अव्वल डिव्हिजन क्लब केरला ब्लास्टर्स, जमशेदपूर एफसी आणि हैदराबाद एफसी देखील सहभागी होणार आहे.

एफसी बंगळुरू, यूनायटेड आणि दिल्ली एफसी भारतीय फुटबॉलच्या सेकंड डिव्हिजनचे प्रतिनिधित्व करतील. तर भारतीय सेनेचे दोन संघ (लाल आणि हिरवा), भारतीय हवाई सेना, भारतीय नौसेना, सीआरपीएएफ आणि आसाम रायफल्सचे संघ राउंड ऑफ 16 मध्ये असतील.

डुरंड कप फुटबॉल स्पर्धेचा पहिला हंगाम 1888 मध्ये शिमला येथे खेळवण्यात आला होता. तेव्हा ही स्पर्धा आर्मी कपच्या नावाने ओळखली जात होती. यात फक्त ब्रिटिश भारतीय सेनेचे सैनिक खेळत होते. पण आता या स्पर्धेत संघानी भाग घेण्यास सुरूवात केली आहे.

मोहन बगान आणि पश्चिम बंगाल हे दोन संघ या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहेत. या दोन्ही संघानी आतापर्यंत प्रत्येकी 16-16 वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

हेही वाचा - टोकियो पॅराऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात 6 अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्यास परवानगी

हेही वाचा - Asian Junior Championships: दुबईत भारतीय बॉक्सिंगपटूंची छाप, आणखी 4 खेळाडू उपांत्य फेरीत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.