ETV Bharat / sports

Women World Cup 2022: पाकिस्तानचा वेस्ट इंडिजवर आठ विकेट्सने विजय; भारताचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग सुकर

author img

By

Published : Mar 21, 2022, 4:26 PM IST

पाकिस्तान महिला संघाने ( Pakistan women's team ) 2022 च्या विश्वचषक स्पर्धेत आपला पहिला विजय नोंदवला आहे. पाकिस्तानने वेस्ट इंडिजचा आठ गडी राखून पराभव केला. वेस्ट इंडिजच्या या पराभवामुळे भारताचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

Pakistan
Pakistan

हॅमिल्टन: आयसीसी महिला विश्वचषक 2022 ( Women World Cup 2022 ) या स्पर्धेतील विसावा सामना पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज ( Pakistan v West Indies ) संघात झाला. हा सामना पाकिस्ताने वेस्ट इंडिजवर 8 विकेट्स राखून जिंकला. तसेच स्पर्धेतील हा पाकिस्तानचा पहिला विजय आहे. पावसाचा व्यत्यय आलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने निर्धारित 20 षटकांत 7 विकेट गमावून 89 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने 18.5 षटकांत 2 गडी गमावून 90 धावा करत विजय मिळवला.

या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक ( Pak won the toss ) जिंकून वेस्ट इंडिज संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. त्यानुसार प्रथम फलंदाजी करायला आलेल्या वेस्ट इंडिज संघाची सलामीवीर हेली मॅथ्यूज अवघी 1 धाव करून फातिमा सनाची बळी ठरली. डायंड्रा डॉटिन आणि स्टेफनी टेलरने दुसऱ्या विकेटसाठी 15 धावांची भागीदारी केली. डॉटिन 27 आणि टेलर 18 धावांवर बाद झाली.

पाकिस्तानच्या तगड्या गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजच्या एकापाठोपाठ एक विकेट पडत राहिल्या. खालच्या क्रमवारीत, एफी फ्लेचरने नाबाद 12 आणि आलिया अॅलनने नाबाद 9 धावा केल्या. अशा प्रकारे पूर्ण 20 षटके खेळताना वेस्ट इंडिजने 89/7 ( West Indies 89/7 ) धावा केल्या. पाकिस्तानसाठी गोलंदाजी करताना निदा दारने सर्वाधिक 4 बळी घेतले आणि आपल्या देशासाठी विश्वचषकातील सर्वोत्तम गोलंदाजीची नोंद केली. अनम अमीनला काही यश मिळाले नाही. पण तिने 4 षटकात फक्त 6 धावा देऊन कॅरेबियन फलंदाजांना मोकळेपणाने खेळण्याची संधी दिली नाही.

  • Shakera Selman walks in to bowl and makes an impact!

    Muneeba Ali's steady knock of 37 runs from 43 balls comes to an end. #CWC22 pic.twitter.com/Wb6KwYJm3R

    — ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पाकिस्तान संघाला विजयासाठी 90 धावांचे लक्ष्य मिळाले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाला पहिला धक्का 22 धावांवर बसला. सलामी फलंदाजी सिदरा अमिन 8 धावा काढून बाद झाली. दुसरी सलामीवीर मुनिबा अलीने चांगली फलंदाजी करत 37 धावा केल्या. कर्णधार बिस्माह मारूफ ( Captain Bismah Maruf ) आणि ओमामा सोहेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी 33 धावा जोडून संघाला विजय मिळवून दिला. पाकिस्तानने सात चेंडू बाकी असताना 2 बाद 90 धावा केल्या. बिस्माहने नाबाद 20 धावा केल्या. त्याचवेळी सोहेलने नाबाद 22 धावा केल्या. 2009 नंतर विश्वचषकात पाकिस्तानचा हा पहिलाच विजय आहे. निदा दारला 4/10 च्या गोलंदाजीच्या कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

संक्षिप्त धावफलक:

वेस्टइंडिज: 89/7 (डॉटिन 27, निदा डार 4/10).

पाकिस्तान: (मुनीबा अली 37, ओमैमा सोहेलो 22, शकीरा सेल्मन 1/15).

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.